मदनलाल उधोओरम शर्मा म्हणजेच आपला क्रिकेटपटू मदनलाल याचा जन्म 20 मार्च 1951 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्याची कसोटी क्रिकेटची कारकीर्द 1974 ते 1986-87 अशी होती. मदनलाल म्हटले समोर यायचा तो त्याचा वेगळा रन-अप अर्थात तो ऑल राऊंडर होता हे महत्वाचे. त्या कालखंडामधील तो महत्वाचा खेळाडू होता. मिडल ऑर्डरमध्ये बिन्धास फलंदाजी करत असे. तो कसोटी क्रिकेट आणि एकदवसीय क्रिकेटमध्ये महत्वाचा खेळाडू होता आणि महत्वाचे म्हणजे जो वर्ल्ड कप भारतीय संघाने 1983 मध्ये जिंकला त्या सामन्यांमध्ये तो होता. वर्ल्ड कपच्या त्या फायनल सामन्यात त्याने जलद गतीने तीन विकेट्स मिळवल्या त्यामुळे वेस्ट इंडिजचे कंबरडे मोडले होते आणि आपण वर्ल्ड कप जिंकला होता. अर्थात ह्या वर्ल्ड कप जिकंण्यासाठी प्रत्येक खेळाडूचे अत्यंत महत्वाचे स्थान होते हे जगजाहीर आहेच. जेव्हा भारतीय संघाने 1981 मध्ये इंग्लंडवर मुंबईमध्ये विजय मिळवला तेव्हा त्यामध्ये त्याचा मोठा वाटा होता तर 1983 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना बंगलोरमध्ये त्याने 74 धावा केल्या होत्या.
मदनलाल याने त्याचा पहिला कसोटी सामना 6 जून 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध मॅचेस्टर येथे खेळला होता. ह्या सामन्यात त्याने 31 षटकात 56 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर तो 1977-78 पर्यंत म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या टूरपर्यंत भारतीय संघाचा भाग होता. त्यानंतर तो काही कारणामुळे टीमच्या बाहेर गेला परंतु 1981-82 इंग्लंडविरुद्ध असलेल्या सिरीजमध्ये तो परत खेळू लागला. त्यानंतर 1983 चा वर्ल्ड कप आणि परत 1986 मध्ये इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामने खेळला .
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मदनलाल याचा परफॉर्मन्स अत्यंत रेग्युलर होता. अनेकवेळा त्याने त्यांच्या टीम ला अनेक संकटांमधून जलद विकेट्स घेऊन बाहेर काढले आहे. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये 5,270 धावा आणि 351 विकेट्स घेतल्या आहेत.
मदनलाल यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे 19 जून 1987 रोजी खेळला . त्या सामन्यात त्याने पहिल्या इनिगमध्ये 20 धावा काढल्या आणि 11.3 षटकांमध्ये 18 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने नाबाद 22 धावा काढल्या . हा सामना भारतीय संघाने 279 धावांनी जिंकला.
मदनलाल याने 39 कसोटी सामन्यात 1,042 धावा केल्या त्यामध्ये त्याने 5 अर्धशतके केली. कसोटी सामन्यांमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या होती 74 धावा तसेच त्याने 71 विकेट्सही घेतल्या. त्याने एका इनिंगमध्ये 23 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. तर 67 एकदिवसीय सामन्यात त्याने 401 धावा केल्या तसेच नाबाद 53 धावा काढल्या. एकदिवसीय सामन्यात त्याने 73 विकेट्स घेतल्या. तसेच 20 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. आणि 18 झेलही पकडले. त्याने 232 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात 10,204 धावा केल्या त्यामध्ये त्याने 22 शतके 50 अर्धशतके केली. तसेच फास्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या होती 223 धावा. तसेच त्याने ऐकून 625 विकेट्स घेतल्या . त्याने एका इनिंगमध्ये 31 धावा देऊन 9 विकेट्स घेतल्या होत्या आणि 141 झेलही पकडले होते.
निवृत्तीनाथ मदनलाल याने अनेक टीम्सना ना कोचिंग दिले त्याचप्रमाणे त्याने क्रिकेट अकादमी काढली. काही काळ ते राजकारणात होते. त्याने एप्रिल 2013 मध्ये टी .व्ही . वरील एक क्राईम शो मध्ये कामही केले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply