एखादी व्यक्ती किंवा मुलगा विक्रम करतो आणि लोकांच्या त्याच्याकडून अपेक्षा वाढतात. कल्याणमधील प्रणव धनावडे याने 323 चेंडूत नाबाद 1009 धावा केल्या. तो क्रिकेट मधील आंतर राष्ट्रीय विक्रम ठरला, त्यावेळी मी तेथे उपस्थित होतो त्या मुलाने किती मेहनत घेतली ते मी बघीतले आहे आणि मग ठरवले आपण वेगळा विक्रम प्रणव धनावडे याच्या या उत्तुंग खेळीवर करावा.
योग्य संधी मिळताच मी प्रणव धनावडे याच्या 323 स्वाक्षऱ्या 33 बॅटवर घेतल्या. शेवटी रेकॉर्ड रेकॉर्ड असतो, धोनीने देखील प्रणव बद्दल विधान करताना म्हटले होते, इतका वेळ मैदानावर उभे राहून खेळणे म्हणजे सोपे काम नाही. मलाही तेच वाटते हा विक्रम कुणी परदेशामधील मुलाने केला असता तर त्याला वेगळे स्वरूप दिले गेले असते, तो विक्रम आपल्या देशामधील मुलाने केला हे महत्वाचे आहे म्हणून मी प्रणवच्या 323 स्वाक्षऱ्या घेतल्या कारण त्याने 323 चेंडूत नाबाद 1009 धावा केल्या अर्थात अनेकांना हा माझा वेडेपणा वाटेल पण जे आहे ते आहे.
आजही प्रणव शिक्षण सांभाळून खेळत आहे त्याच्या आईला मदत करत आहे. कदाचित तो परत इतके असे खेळू शकणार नाही , कारण अशी खेळी वारंवार होत नसते. परंतु काही शतके जरूर करेल, त्याची वाटचाल सुरु . त्याचे प्रयत्न ,अभ्यास सुरु आहे आहे . त्याला पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा
— सतीश चाफेकर.
Leave a Reply