नवीन लेखन...

क्रिकेटपटू रॉय टॅटरसॉल

रॉय टॅटरसॉल याचा जन्म १७ ऑगस्ट १९२२ रोजी इंग्लंडमधील लॅकेशायर येथे झाला. त्याने त्याचा पहिला फर्स्ट क्लास क्रिकेट सामना १९४८ मध्ये खेळला त्यावेळी इंग्लंडच्या संघाची गोलंदाजी कमजोर पडली होती ह्याचे प्रमुख कारण म्हणजे दुसरे महायुद्ध. त्या कालखंडात क्रिकेटकडे खूप कमी लक्ष दिले गेले, अर्थात युद्धपरिस्थतीमुळे खेळण्यास असे पोषक वातावरण तेथे नव्हते. त्याने पहिला सामना लॅंकेशायर साठी मध्यम जलद गती गोलंदाज म्हणून खेळला. १९५० पर्यंत तो एस्टॅब्लिश झालेला नव्हता. त्याने पुढे त्याच्या गोलंदाजीमध्ये बदल केला विशेषतः ऑफ ब्रेकबद्दल. त्यावर्षी ओल्ड ट्रॅफर्डवर ग्राउंड्समनने मैदानावर पाणी टाकण्याचे ठरवले. जेणेकरून रिझल्ट्स चांगले मिळतील. रॉय टॅटरसॉलला ते नको होते तरीपण तो नाउमेद झाला नाही कारण तो फर्स्ट क्लास क्रिकेटमधील त्यावेळचा लिडिंग विकेट्स घेणारा होता त्यावेळी त्याने ११४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचा स्वतःवर विश्वास होता.

रॉय टॅटरसॉलने त्याचा पहिला कसोटी सामना इंग्लंडकडून २ फेब्रुवारी १९५१ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. या सामन्यामध्ये त्याला ४ विकेट्स मिळाल्या. १९५१ मध्ये कसोटी सामन्यात त्याला १२ विकेट्स मिळाल्या त्याच्या त्या होमपीचवर. त्यानंतर त्याने ५१ धावामध्ये ८ विकेट्स घेल्या त्या मेलबर्न क्रिकेट क्लबबरोबर खेळताना. भारतीय दौऱ्यावर असताना त्याने खराब पीच असताना देखील १२५ धावामध्ये ८ विकेट्स घेतल्या. त्यामुळे इंग्लंडला त्या सिरीजमध्ये विजय मिळवता आला.

रॉय टॅटरसॉल हा खरेतर ‘स्टॉक बॉलर’ म्हणूनही ओळखला जात असे. त्याने ८ इनिंग्समध्ये २४६ षटके टाकली होती. परंतु इंग्लंडला गेल्यावर त्याच्यापुढे जिम लेकर, जॉनी वॉर्डले आणि रॉली जेनकिन्स हे स्पर्धक होतेच आणि सिलेकटर्सही होतेच. १०० विकेट्स १९५७ पर्यंत घेतल्यानंतर कसोटीमध्ये त्याला फक्त १९५३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि १९५४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळवले.

पुढे त्याने १९५७ पर्यंत लँकेशायर कडून खेळताना उत्तम गोलंदाजी केली. तसेच १९५६ हे वर्ष वगळता प्रत्येक वर्षी १०० काऊंटी चॅम्पीअनशिप मध्ये १०० विकेट्स घेतल्या आहेत. जॉन के याच्या म्हणण्याप्रमाणे ओल्ड ट्रॅफर्ड मधील पॉलिसीमुळे तो सतत टार्गेट झालेला आहे. १९५९ मध्ये हिल्टन आणि रॉय टॅटरसॉल यांना ड्रॉप केले गेले त्यानंतर १९६० मध्ये टॅटरसॉल याला १९६० च्या सिझनमध्ये परत बोलावले परंतु तो जास्त प्रभाव पडू शकला नाही, १९६१ नंतर त्याचा परफॉर्मन्स जास्त चांगला होऊ शकला नाही. त्याने शेवटचा सामना मार्च १९६३ मध्ये खेळला. त्याची खेळण्याची स्टाईल ओर्थडॉक्स जिम लेकरपेक्षा वेगळी होती. त्यामुळे तो खरे तर त्याला कसोटी क्रिकेटमधील त्याच्या स्थानापासून सतत दूर जायला लागत असे. गोलंदाजी करताना त्याचे बोट म्हणजे इंडेक्स फिंगर चेंडूच्या सीम भोवती असे आणि तो अत्यंत शार्पपणे ऑफ ब्रेक टाकत असे. तो जिम लेकर पेक्षा जास्त जलद टाकत असे आणि जेव्हा पीच ओले असे तेव्हा त्याला शार्पनेस त्याच्या होमपीचवर वाढवावा लागे. त्याला आणि हिल्टन या दोघांचा रिवॉर्ड देऊन १९५० साली काऊंटी क्रिकेटने गौरव केला होता.

रॉय टॅटरसॉल याने त्याचा शेवटचा कसोटी सामना पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सला १० जून १९५४ रोजी खेळला. तर त्याने शेवटचा फर्स्ट क्लास सामना १९६४ साली खेळला. त्याने १६ कसोटी सामन्यामध्ये ५० धावा काढल्या आणि ५८ विकेट्स घेतल्या त्यामध्ये त्याने एका इनिंगमध्ये ५२ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या आणि एकूण ८ झेल पडकले. रॉय टॅटरसॉल याने ३२८ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये २०४० धावा केल्या त्यामध्ये त्याचे १ अर्धशतक आहे आणि त्याने १८.०३ या उत्तम सरासरीने १३६९ विकेट्स घेतल्या. त्याने एका इनिंगमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स ९९ वेळा घेतल्या तर एका डावामध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त विकेट्स १८ वेळा घेतल्या. त्याने एका इनिंगमध्ये ४० धावा देऊन ९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याने ऐकूण १४६ झेलही पकडले आहेत.

रॉय टॅटरसॉल याचे ९ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.

— सतीश चाफेकर. 

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..