MENU
नवीन लेखन...

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रुसी सुर्ती

रुसी फ्रेमरोज सुर्ती ह्यांचा जन्म गुजराथमधील सुरत येथे २५ मे १९३६ रोजी पारशी कुटूंबात झाला. ते भारताकडून क्रिकेट खेळलेच त्याचप्रमाणे गुजराथ, राजस्थान आणि क्वीन्सलँडकडूनही क्रिकेट खेळले. ते ऑल-राउंडर होते. रुसी सुर्ती गोलंदाजी करताना चेंडू डाव्या हाताने सिम आणि स्विंग करत असत तर प्रसंगी स्पिन देखील करत असत. ते उत्तम क्षेत्ररक्षकही होते , एकनाथ सोलकरप्रमाणे. ते स्वतः सर गॅरी सोबर्स ला आदर्श मानत असत. त्यांचा खेळ पाहून त्यांना ‘ गरिबांचा गॅरी सोबर्स ‘ देखील म्हणत. त्यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना २ डिसेंबर १९६० रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला .

१९६७-६८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडच्या टूरवर असताना त्यांनी उत्तम परफॉर्मन्स केला त्यांनी ऑस्ट्रेलियाला ऐकूण ३६७ धावा केल्या. त्यावेळी ऑस्ट्रलियाचे गोलंदाज होते ग्रॅहम मॅकँझी , अँलन कॉनली , डेव्ह रेननबर्ग . तर न्यूझीलँडला त्यांनी ३२१ धावा केल्या . ऑस्ट्रेलियाच्या त्या टूरवर त्यांनी १५ विकेट्स घेतल्या. दोन्ही देशाविरुद्ध त्यांनी ४५.५० च्या सरासरीने ६८८ धावा केल्या आणि ऐकून २२ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्यांनी ९९ धावा केल्या. १९६९-७० मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले त्यावेळी ते क्वीन्सलँड कडून शेफील्ड शिल्ड खेळत होते.

रुसी सुर्ती यांची फर्स्ट क्लास क्रिकेट करिअर देखील उत्तम होती . त्यांनी १९५६ ते १९७२ पर्यंत ६ शतके केली. त्याचबरोबर त्यांनी पहिल्यांदा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गुजराथकडून मुंबईविरुद्ध विरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियम वर सामना खेळला तर शेवटचा फर्स्ट क्लास सामना त्यांनी क्वीन्सलँडकडून दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. क्वीन्सलँडकडून ते १९७२ पर्यंत खेळत होते.

रुसी सुर्ती यांनी शेवटचा कसोटी सामना ४ नोव्हेंबर १९६९ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यांनी २६ कसोटी सामन्यामध्ये १२६३ धावा केल्या त्यामध्ये त्यांची ९ अर्धशतके होती तर त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती ९९ धावा. तसेच त्यांनी ४२ विकेट्स घेतल्या आणि त्यांनी एका इनिंगमध्ये ७४ धावा देऊन ५ खेळाडू बाद केले. तसेच त्यांनी ऐकून २६ झेल घेतले.

रुसी सुर्ती यांनी १६० फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये ८०६६ धावा केल्या त्यामध्ये त्यांनी ६ शतके आणि ५३ अर्धशतके केली. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद २४६ धावा. त्याचप्रमाणे त्यांनी २८४ विकेट्सही घेतल्या. तर एका इनिंगमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स त्यांनी १० वेळा घेतल्या . त्यांनी एका इनिंगमध्ये ४२ धावा देऊन ५ खेळाडू बाद केले आणि ऐकूण १२२ झेल घेतले.

ते दरवर्षी भारतात यायचे एकदा त्यांचे भाषण वानखेडे स्टेडिअमवर होते तेव्हा त्या भाषणाला गेलो होतो तेव्हा त्यांची स्वाक्षरी मिळाली होती. त्याचे खाजगी आयुष्य वेगळे होते त्यांचा घटस्फोट झालेला होता आणि ते ऑस्ट्रलिया येथील क्वीन्सलँड येथे रहात होते. त्यांचे निधन त्यांच्या वयाच्या ७६ व्या वर्षी १३ जानेवारी २०१३ रोजी मुंबईत जसलोक हॉस्पिटलमध्ये झाले.

सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..