सिडने बार्न्स वयाच्या 21 व्या वर्षी 1894 मध्ये जलद गोलंदाज म्हणून नावारूपास येत होते तेव्हा ते स्टॅफोर्डशायर काउंटी क्रिकेट क्लबमध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून काम करू लागले. पुढे ते रिश्टन क्रिकेट कल्बमध्ये जाऊ लागले आणि 1899 मध्ये ते त्या क्लबमधून क्रिकेट खेळले. 1894 च्या सीझनमध्ये बार्न्स यांना वॉर्वीकशायर कडून खेळण्यासाठी बोलवणे आले. 1895 मध्ये ते काउंटी चॅम्पिअनशिप खेळले . एका छोट्या सामन्यात त्यांनी पहिला सामना खेळला त्यावेळी त्यांनी 8 षटके टाकून 27 धावा दिल्या परंतु त्यांना एकही विकेट मिळाली नाही , तो सामना अनिर्णित राहिला. त्याचवर्षी 23 ऑगस्टला बर्न्स यांनी त्यांचा पहिला फर्स्ट क्लास सामना ग्लुस्टरशायर विरुद्ध खेळला . पहिल्या इनिंगमध्ये 72 षटके टाकली गेली परंतु वाईट हवामानामुळे त्यांना मैदानावर उतरता आले नाही आणि तो सामना अनिर्णित राहिला. सिडने बार्न्स यांनी 1995 ते 1899 या कालखंडात 411 विकेट्स घेतल्या . त्यांचा उत्तम परफॉर्मन्स 1898 मध्ये झाला , त्या वर्षी त्यांनी 8.46 च्या सरासरीने 96 विकेट्स घेतल्या.
सिडने बार्न्स यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो 13 डिसेंबर 1901 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी नाबाद 26 धावा केल्या आणि 65 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या , तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 1 विकेट घेतली , हा सामना इंग्लंडने 1 इनिंग आणि 124 धावांनी जिंकला. त्यावेळी इंग्लन्डच्या संघात सिडने बार्न्स , कॉलिन ब्लाथे , लेन ब्रॉड हे तिघेही त्यांचा पहिला सामना खेळत होते आणि या तिघांनी दोन्ही इनिंग मिळून 20 विकेट्स म्हणजे त्या सामन्यातील सर्व विकेट्स घेतल्या.
सिडने बार्न्स यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना 18 फेब्रुवारी 1914 रोजी दक्षिण आफ्रीकेविरुद्ध डर्बन येथे खेळला . शेवटच्या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी 56 धावा देऊन 7 विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 88 धावा देऊन 7 विकेट्स घेतल्या होत्या. म्हणजे शेवटच्या सामन्यात त्यांनी एकूण 20 पैकी 14 विकेट्स घेतल्या. त्यानंतर पहिले महायुद्ध सुरु झाल्यामुळे फारसे सामने झालेच नाहीत. परंतु वयाच्या 55 व्या वर्षी वेल्स येथे त्यांनी 51 धावांमध्ये 7 विकेट्स घेतल्या तर 67 धावांमध्ये 5 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या सामन्यात वेल्स कडून खेळताना 28 धावांमध्ये 4 विकेट्स काढल्या तर 62 धावांमध्ये 8 विकेट्स काढल्या.
सिडने बार्न्स यांनी 37 कसोटी सामन्यात 242 धावा केल्या आणि 16.43च्या सरासरीने 189 विकेट्स घेतल्या . एका इनिंगमध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त विकेट्स 24 वेळा घेतल्या त्याचप्रमाणे त्यांनी एका इनिंगमध्ये 103 धावा देऊन 9 विकेट्स घेतल्या. त्यांनी 133 फर्स्ट क्लास सामन्यात 1,573 धावा केल्या आणि 17.09 च्या सरासरीने 719 विकेट्स घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त विकेट्स 68 वेळा घेतल्या . त्याचप्रमाणे त्यांनी 103 धावा देऊन 9 विकेट्स घेतल्या. त्यांनी सर्व प्रकारच्या म्हणजे क्लब क्रिकेट , कसोटी क्रिकेट , फर्स्ट क्लास क्रिकेट आणि लीग क्रिकेटमध्ये एकूण 6,229 विकेट्स घेतल्या. सुप्रसिद्ध क्रिकेट तज्ञ सर नेव्हिल कार्ड्स यांनी 1963 च्या विझडेनमध्ये त्यांना आदरांजली वाहिली होती. वयाच्या 62 व्या वर्षी 1935 रोजी ते दोनदा स्टॅनफोर्डशायर कडून खेळले. तेव्हा त्यांनी 36 धावांमध्ये त्यांना एकही विकेट मिळाली नाही तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी 61 धावांत एक विकेट घेतली.
Leave a Reply