दादा कोंडके यांचे चित्रपट म्हटलं की विनोद आणि त्यातल्या त्यात द्विअर्थी विनोदच आठवतो. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईतील नायगाव येथे झाला. द्विअर्थी शब्द आणि संवाद ही दादांच्या चित्रपटांची खासियत होती. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळं दादांना जास्त ओळख मिळाली.
‘विच्छा माझी’ मुळे भालजी पेंढारकर यांनी त्यांना आपल्या ‘तांबडी माती’ या चित्रपटात संधी दिली. त्यांचा पहिला चित्रपटात ‘तांबडी माती’ १९६९ मध्ये प्रदर्शित झाला. दादा कोंडके निर्मित पहिला चित्रपट सोंगाड्या १९७१ मध्ये आला. सोंगाड्या खूपच हिट ठरला. चंदू जमादार,राम राम गंगाराम, राम राम अन्थाराम , एकटा जीव सदाशिव, तुमच आमच जमल, अंधेरी रात मी दिया तेरी हात मे या काही प्रसिध्द सिनेमात ते मुख्य भूमिकेत होते. त्यांचे ९ चित्रपट त्या काळात २५ आठवड्यापेक्षा जास्त चित्रपट गृहात चालले. याची गिनीज बुकातही नोंद आहे.
द्विअर्थी शब्द आणि संवाद ही दादांच्या चित्रपटांची खासियत. तेव्हा दादांना या विषयी बराच विरोध झाला. दादांनी मराठी भाषेत कलाकार आणि निर्माते असे दुहेरी भूमिका बजावली त्यासोबतत हिंदी आणि गुजरातील चित्रपटांची ही निर्मिती केली. दादा कोंडके यांनी सोंगाड्या (१९७१), आंधळा मारतो डोळा (१९७३), पांडू हवालदार (१९७५), राम राम गंगाराम (१९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या ( १९७८) असे अनेक सिल्व्हर ज्युबली मराठी चित्रपट दिले.
हिंदी व मराठी मिळून दादा कोंडके यांनी १९ चित्रपटांची निर्मिती केली व त्यात भूमिकाही केल्या. १९९४ मध्ये आलेला ‘सासरच धोतर’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्याची निर्मितीही दादा कोंडके यांनीच केली होती. फक्त चित्रपट आणि नाटक नव्हेतर दादा कोंडके यांनी राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांनी याची कबुली स्वतः एका मुलाखतीत दिली होती.
शिवसेनेच्या सभेत दादा स्टेजवर भाषणे देत. त्यांचा प्रचंड असा चाहता वर्ग असल्यानं ही भाषणं ऐकण्यासाठी गर्दी होत असे. दादा कोंडके यांचे १४ मार्च १९९८ रोजी निधन झाले.
संकलन संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply