ज्येष्ठ आंबेडकरी नेते आणि माजी मंत्री दादासाहेब_रुपवते यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९२५ रोजी अकोले, अहमदनगर येथे झाला.
दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते यांचे प्राथमिक शिक्षण अकोलेत व पुढील शिक्षण नाशिकला झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कॉलेजमधून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत अर्थात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून दादासाहेब रुपवतेनी विद्यार्थी वर्गाने वसा घेतला. डॉ.आंबेडकरांच्या विचाराने दादासाहेब रूपवते प्रेरीत झाले होते. त्यांनी मुंबई विद्यापीठाची पदवी संपादन केली.
ज्या वेळी दादासाहेब रूपवते शिक्षण घेत होते त्याचवेळी डॉ. आंबेडकरांनी दादासाहेबांच्या अंगचे गुण ओळखून मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे रेक्टर म्हणून त्यांची नेमणूक केली. बाबासाहेबांचा जवळून सहवास लाभला व शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्राकडे ओढले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेऊन त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकत्यांच्या मदतीने दलित समाज सेवा संघ शैक्षणिक संस्था स्थापन केली. अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून वसतिगृहांची व विद्यालयाची निर्मिती केली. संगमनेर – अहमदनगर व पुणे येथे माध्यमिक विद्यालय केले. दलित व आदिवासी समाजातील मुला मुलींना शिक्षणाची संधी देण्यासाठी नगर मध्ये जिल्ह्यातील तालुक्यात वसतिगृहांची स्थापना केली. शिक्षणातून बाहेर पडणाऱ्या तरुण तरुणी आत्मकेंद्रित, मध्यमवर्गीय बनवू नयेत. असे दादासाहेबांना वाटत असे. सतीगृहे समाजपरिवर्तनाची क्रांतिकारी दृष्टी देणारी आणि सामाजिक बांधिलकीची दीक्षा देणारी स्फूर्तिस्थाने बनावी म्हणून प्रयत्न केले. शिक्षण क्षेत्रात जी दृष्टी घेऊन आले होते त्याची झलक त्यांनी वसतीगृहांना अर्थपूर्ण नावे दिली. त्यात श्रीरामपूरच्या वसतीगृहाला शंभूक नेवासे वस्तीगृहाला नागसेन, म.ज्योतिबा फुले व संगमनेर सिद्धार्थ विद्यालय व अ.नगर येथे संबोधी विद्यालय नावे दिली, कृती, शिक्षण, संस्कृती आणि परिवर्तना बदलची संम्यक दृष्टी यांची नावे साक्ष देतात. डॉ. आंबेडकरांची प्रेरणा घेऊन त्यांनी बहुजन शिक्षण संघ या संस्थेची स्थापना केली. २२ वसतीगृह ५ विद्यालय, २ कनिष्ठ महाविद्यालय, अने…केली.
दादासाहेबांच्या मुळगावी म्हणजे अकोलेत महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नव्हती. अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी संगमनेर – नाशिक नगर पुणे जनतेला जावे लागे. दादासाहेबांनी पुढाकार घेऊन अकोले एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.अकोले येथील महाविद्यालयाचे दादासाहेब रुपवते विज्ञान अगस्ती वाणीज्य कला महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण यांच्या सल्ल्यानुसार मराठी विश्वकोश निर्मितीच्या कार्यात लक्ष्मणशास्त्री जोशी यांना संपादक म्हणून संकलनास दादासाहेबांनी सहकार्य केले. त्यासाठी ते वाई येथे येऊन राहिले होते. पाली आणि संस्कृतसारख्या प्राचीन भाषांचे सार जतन करून, तत्कालीन राजकीय आणि सामाजिक समस्यांचे विवेचनात्मक विश्लेषण आणि त्याचे दस्तावेजकरण करून त्यांनी आपली बौद्धिक जबाबदारी पार पाडली. बौद्धधर्माच्या प्रसारात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी योगदान दिले. दादासाहेबांनी आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतातील दलित आणि अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व केले.
१९६८ ते १९७८ या दहा वर्षांच्या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. १९७२ ते १९७५ आणि १९७७ ते १९७८ या कालावधीत दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. त्यावेळी त्यांच्याकडे समाज कल्याण, गृहनिर्माण, सांस्कृतिक, मत्स्यव्यवसाय, झोपडपट्टी इत्यादी खात्यांचा कार्यभार होता. ते विनोदी पण स्पष्टवक्ते होते. दादासाहेब रुपवते यांचे २३ जुलै १९९९ रोजी निधन झाले.
संजीव_वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply