नवीन लेखन...

दगड

आपला म्हणजे माणसाचा आणि दगडाचा फार जवळचा संबंध. कारण आदीम काळात दगडाला दगड घासुनच त्याने आग निर्माण केली. निमुळत्या टोकाच्या दगडांचा त्याने हत्यारा सारखा वापर केला. दगडावर दगड रचून राहण्यासाठी व्यवस्था केली.

दगडाचे एक ना अनेक उपयोग माणसाने आपल्या जीवनात सुरू केलेले आपण पाहू शकतो. इतकेच नव्हे तर मठ्ठ मुलाला दगडाची उपमा देखील दिली जाते. निष्ठुर असणाऱ्या व्यक्तीला दगडाच्या काळजाचा असे संबोधले जाते.

सांगायचे तात्पर्य असे की दगडाचा आणि माणसाचा जवळचा संबंध… असो.

लहानपणी विविध आकाराचे दगड गोळा करण्याचा आम्हा मुलांना एकप्रकारे छंदच होता. तेव्हा रस्त्याच्या कडेला आणून टाकलेल्या वाळून खेळताना विविध रंगाचे, आकाराचे दगड गोळा केले जात असत. हे दगड गोळा करून घरी आणायचे, ते स्वच्छ धुवायचे आणि खेळण्यात वापरायचे. कधी कधी तर आमच्यातला कुणीतरी दोन सपाट दगडाचे तुकडे दोन्ही हातात देऊन ते एकमेकांना घट्ट जोडायला सांगायचा आणि मग ते हळुहळु सुटे करण्यासाठी आग्रह धरायचा.. पण तसे करण्यासाठी थोडे कष्ट पडायचे.. हातातले हे दगडे जणू एकमेकांना चिकटले जायचे.. तेव्हा त्याची गंमत वाटायची… बऱ्याच वेळा खेळताना गोळा केलेले गोल दगड हाती घेऊन समोरच्या झाडावरच्या कैऱ्यांना अचुक नेम धरला जायचा. एका दगडात किमान एक तरी कैरी पडली पाहिजे… असा सर्वांचाच आग्रह असायचा..

घरापासुन थोड्या अंतरावर एक जुनं मंदिर होतं… त्याच्या भिंती या दगडानेच तयार केलेल्या असायच्या. चौकोनी पण काहीसे ओबड-धोबड अशा दगडांचा वापर करून मंदिराच्या भिंती बांधलेल्या होत्या. मंदिराच्या पुढ्यात दगडांच्या सहाय्याने दीपमाळ उभारलेली होती… तिचे वैशिष्ट्ये असे की ती हलत असे. अशा दीपमाळ आजही काही ठिकाणी आपल्याला पहायला मिळतात. मंदिराच्या गाभाऱ्यात दगडात घडवलेली सुंदर, सुबक आणि तितकीच तेजस्वी मुर्ती. मग प्रश्न पडतो.. एखाद्या दगडाच्या ठायी सुंदर, सुबक आणि तेजस्वी मुर्ती असू शकते काय? असेल तर ती आपल्याला साध्या डोळ्यांनी का दिसत नाही. त्यासाठी कोण्या मुर्तीकाराचेच डोळे घ्यावे लागतात.. हे देखील तितकेच खरे. दगडात मुर्ती असतेच, ती शोधणारी नजर मात्र हवी असते… रामनाम लिहिलेले दगड पाण्यावर तरंगतात हे रामायण काळापासुन आपण ऐकत आलेलो आहोतच. म्हणजे रामायण काळापासुन दगडाचा आणि मानवाचा अगदी जवळचा संबंध असल्याचे निदर्शनास येते.

आपल्या दैनंदिन जीवनात दगडाचा वापर प्रामुख्याने होतच असतो, म्हणा. कारण आपल्या घरातच उच्च प्रतीच्या दगडापासुन निर्मित फरशी (टाईल) बसवलेली असते. मग ती संगमवरी, कधी शहाबादी, कधी साधीच फरशी असते. त्यातही हजारो प्रकार असतात. पायऱ्यांवर बसवलेले दगड वेगळे असतात. किचनमध्ये वापरला जाणारा दगड वेगळा असतो, ज्याला कडप्पा (कटप्पा नव्हे) म्हटले जाते. इतर ठिकाणी कदाचित त्याची नावे वेगळी असू शकतात. घरासमोर तयार होणाऱ्या रस्त्यावर टाकली जाणारी खडी देखील दगडाचाच प्रकार.

कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो. हिरा शेवटी काय आहे, तर दगडच ना. पण मग या दगडाला मुल्यत्व प्राप्त होते, ते त्याच्या अपारदर्शीपणामुळे.. चमकमुळे आणि विविध पैलूं मुळे. या गुणवैशिष्ट्यांमुळेच मग हिऱ्याचे मुल्य वाढते, त्याची किमत वाढते. शाळेत गुरूजी प्रत्येक मुलांत एक दगडच पहायचे. आपल्या कौशल्याने मग मुलांमधील दगडाला पैलू पाडायचे. मुलं घडत जायची..

लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते अशी मान्यता आहे, हे लक्षात घेतल्यास दगडाचे देखील तसेच आहे. कारण एखाद्या साधारण दगडाला कोण्यातरी कलाकाराचा हात लागला तर त्यातून मुर्ती साकारते, वनवासात असताना रामाच्या स्पर्शातून अहिल्या प्रकटली होती. विठ्ठलाची मुर्ती आणि नामदेवाची पायरी दोन्ही दगडाच्याच ना. दोघांनाही भाविकांच्या मनात श्रद्धेचं स्थान…..

— दिनेश दीक्षित (२० एप्रिल २०१८)

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..