नवीन लेखन...

दहाव्या वाढदिवसाच्या सदिच्छा

मोठ्या नातवाचा आज दहावा वाढदिवस. सर्व घर आनंदाने फुलून गेले होते. त्याचे मित्र मंडळी शेजारचे,  काका मामा आत्या मावशी ह्यांच्या कडील मंडळी नातेसंबंधी एकत्र जमली होती. प्रथम आपल्या पद्धतीने दिवा लावला. त्याला ओवाळले गेले. नंतर आधुनिक पद्धतीने केक ठेवला. त्यावरती दहा मेणबत्या लाऊन एकदम फुंकून  विझउन  टाकल्या. टाळ्यांचा कडकडाट Happy  Birth  Day  चे गाणे म्हंटले गेले. फुगे फोडणे, गाणे, नाचणे झाले. सर्वाना खाण्याच्या डिशेस दिल्या गेल्या. आनंदामध्ये सर्वांनी वेळ घालविला. नातवाला अनेक भेट वस्तू मिळाल्या. आठवणीने त्याने फोन करून, काकांकडे अमेरिकेत गेलेल्या आजोबाना, हा आनंदमय वाढ दिवसाचा वृतांत सांगितला. आजोबा भारावून गेले.  “ आजोबा माझ्या वाढ दिवसाला मला काय देणार ? “

त्यांचे डोळे पाणावले. नातवंड ही दुधावरची साय असते म्हणतात. अर्थात समाधानाचा उच्य बिंदू. हा निसर्ग असतो. त्यात कृत्रिमता नसते.

“ काय देऊ मी तुला बाळा,  माझे कुणालाही काही देण्याचे दिवस आता संपलेले आहेत. आता जर कुणी काही मलाच देईल, तर ते आनंदाने घेण्याचा हा माझा   काळ. हां! मला वयाचा अधिकार आणि अनुभवाची गाठोडी मिळालेली आहे. त्यातूनच मी तुला काही देऊ इच्छितो.  हे मात्र निश्चीत कि जर तू घेण्यामध्ये, ग्रहण करण्यामध्ये,  रुची प्रेम  व आदर  व्यक्त केलास, तर ती भेट तुला मिळालेल्या इतर कोणत्याही भेटीपेक्षा खूपच चांगली व वरचढ  असेल. कदाचित तुझ्या जीवनाला एक वेगळीच दिशा देणारी ठरेल.”

“ आजोबा ती कोणती ते मला सांगा. तुम्ही सांगाल ते मी करेन. ”

“ प्रथम तुला तुझ्या दहाव्या वाढ दिवसाच्या शुभेच्या आणि आशिर्वाद. खूप आभास कर. शहाणा हो. कुटुंबाच्या नावाला पुढे आण. चांगला नागरिक बनून नाव कमव. तुझा हा दहावा वाढ दिवस, जीवन चक्रामधील अत्यंत महत्वाची पायरी  असते.    शुशू म्हणून, बालक म्हणून, लहान मुल म्हणून, तू आजपर्यंत जगलास. बाल्यावस्थेचा हा तूझा काळ  संपवून, तू आता वेगळ्या दालनात पाउल ठेवीत आहेस.  वय काळ साधारण १० ते १५ ह्याला  पौगनडावस्था म्हटले जाते. जीवनाच्या तारूण्यावस्थेमध्ये पदार्पण करण्याच्या पूर्वीचा हा काळ. व्यक्ती म्हणून जगण्याची ही पूर्व पीठिका असते. निसर्गाचा Reharsal of  adulthood period  म्हणा हवे तर. ह्याच काळात तुझ्या शरीर  ( Physical )  आणि मानसिक  ( Psychological )  वाढीमध्ये एकदम वाढ होऊ लागते. त्यावाढीचा काळ  तुला तुझ्या तरुण बनण्यास  मदत करणारा असतो.  वाढीच्या आलेखामधली ही एक झेप असते.

तुझी आज पर्यंत वाढत जाणारी समज  अर्थात ज्ञान हे ह्या एकदम वाढत जाणाऱ्या  फरकाला  समजण्यास सक्षम होउ लगते.  फक्त तुला सतर्क राहण्याची गरज  असते. चांगले, सदाचारी  भव्य व्यक्तीमत्व  अंगीकारणे अथवा  वाईट प्रवृतीना, हेकेखोर अहंकारी स्वभावाला जवळ करणे, सद्गुणाचे वा दुर्गुणाचे दोन्हीही मार्ग तुला समोर दिसू लागतात. त्यात तुला आवड निर्माण होऊन  कोणत्या मार्गाने जायचे, हे केवळ तू स्वत: च ठरवू शकतोस.

आजपर्यंत तू अर्जुनाच्या, भीमाच्या, एकलव्याच्या, शिवाजीच्या, कृष्णाच्या, रामाच्या, हनुमानाच्या, व अशाच व्यक्तींच्या कथा ऐकल्या आहेस. तसेच  Harry  Potter, Spider Man, Supper Man, घटोत्कच, इत्यादींच्या कथा ऐकल्या, वाचल्या, वा बघितल्या. त्यात तू आनंद घेत होतास. परंतु आता त्या त्या व्यक्तींच्या  चमत्कारामध्ये, दिव्य शक्तीमध्ये, तू एकरुप होण्याचा प्रयत्न करशील. मीच भीम आहे, मीच अर्जुन आहे, मीच हनुमान आहे, यांच्या भूमिकेत जाशील. त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे तुझ्या शारीरिक वा मानसिक हालचाली होऊ लागतील. स्वभावातील हे बदल इतरानाही जाणवतील. ” तू देखील  त्यांच्या प्रमाणे भव्य हो ” हा निसर्गाचा तुला संदेश असला, तरी तुला त्याची सत्यता, आणि वास्तविकता, ह्याचे सतत भान असावे. भावी अर्जुन वा भीम वा हनुमान हो – ह्या संदेशा बरोबरच, आज तू ते नाहीस, ह्याची जाणीव असुदे. कल्पना रम्यतेत आकाशामध्ये भरारी घेण्याचे हे वय असते. वस्त्व्यतेला विसरायला लावणारे हे वय आहे.     ह्यासाठी नेहमी सतर्क राहा. ध्येय मात्र भव्यतेचे असू दे.

वाढ दिवसाच्या निमित्य एक वही लिहिण्यास सुरवात कर. रोज एक पान लिही. आजचा दिवस तू कसा घालविलास. त्यात तुझ्या अभ्यासाची, खेळाची, मित्रांच्या गाठी भेटींची, आई बाबा वा इतर नातेवाईक यांच्या संपर्काची नोंद घेत जा. काही विशेष घडले ते टिपत जा. फक्त जे सत्य तेच लिही. हे केवळ तुझ्यासाठीच असावे. रोज झोपण्यापूर्वी ते तूच वाचवे. चिंतन कर, चर्च्या केव्हाच नको. रात्री झोपताना व सकाळी उठताच तुला प्रिय असलेल्या देवाला वंदन कर. ज्या ज्या वेळी कोणताही चांगला विचार तुझ्या  वाचण्यात आला, तर तो लगेच लिहून घे. त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर.

मी स्वत: बघितलेल्या, ज्या थोर व्यक्ती झाल्या आहेत, त्यांचेच हे वर्णन आहे. हाच माझा अनुभव लक्षात राहू दे. तुला आशीर्वाद- आजोबा.

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..