४ वे दलाई लामा यांचे खरे नाव जेटसुन जमफेल नग्वान्ग लोब्सन्ग येशे तेन्झिन म्हणजेच तेन्झिन ग्यासटो हे आहे .त्यांचा जन्म ६ जुलै १९३५ रोजी तिबेटमध्ये झाला. त्यांच्या आईने डिकी टेसरींगने त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या गोठ्यात चटईवर त्यांना जन्म दिला. ते दोन वर्षाचे असताना त्याच्यामधील वेगळेपण दिसून आले आणि त्यांचा पुनर्जन्म झाला असे मंकच्या लक्षात आले. दलाई लामा या शब्दाचा अर्थ आहे ‘ ओशन ऑफ विझडम ‘ . त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून शिक्षण घ्यायला सुरवात केली आणि वयाच्या २५ व्या वर्षी . बुद्धिस्ट फिलॉसॉफी ‘ मधील डॉक्टरेट मिळवली. तत्पूर्वी २२ फेब्रुवारी १९४० रोजी त्यांना १४ वे दलाई लामा म्ह्णून ल्हासामध्ये घोषित केले गेले होते. तसे पाहिले तर त्याचे आयुष्य संघर्षाचे आहे हा त्यांचा संघर्ष तिबेटीयन लोकांसाठी होता.
तिबेटच्या लोकांच्या समस्या , त्याच्यावर होणारा अन्याय ह्याला त्यांनी जगभर वाचा फोडली. ते त्यासाठी संपूर्ण जगात फिरत होते. त्यांना भारताने आसरा दिलेला पाहून चीनला खटकले होते. कारण भारत आणि चीनच्या मध्ये तिबेट आहे. जर चीनने तिबेट घेतला किंवा त्याच्यावर जबरदस्ती केली असती तर ते भारताला महागात पडले असते. या हेतूने पंडित जवाहरलाल नेहरूंपासून सगळ्यांनी दलाई लामांचे स्वागतच केले, त्यांना सतत पाठिंबा दिलेला दिसतो.
अशा दलाई लामांना प्रत्यक्ष जवळून बघण्याचा , आईकण्याचा दोन तीन वेळा योग मला आला तेव्हा त्यांच्या काही स्वाक्षऱ्याही घेतल्या. ते मुंबईत आले असताना एका पत्रकाराने त्यांना खोडसाळ प्रश्न विचारला तेव्हा मी तिथे होतो तो प्रश्न असा होता की तुम्ही तर जगभर पुरस्कार घेत फिरता, मग तिबेटीयन लोकांसाठी तुम्ही काय करता . तेव्हा ते शांतपणे हसून म्हणाले, मला आमच्या समस्या जगापुढे मांडल्याच पाहिजेत , आमचा देश लहान आहे , त्याच्या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजेत. या त्याच्या उत्तरात खूप काही आले , त्याच्या जगभर फिरण्याचा निश्चित दबाव चीनवर पडला हे कोणीही विसरू शकणार नाही.
दलाई लामांना शांततेचे दूत म्हटले गेले आहे. त्यांचे जगभर सन्मान झाले. त्यांना १९८९ सालचा शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला .
आता परिस्थिती खूप वेगळी आहे, ते येणारा काळच सांगेल.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply