नवीन लेखन...

डाळीच्या करंज्या

Dalichya karanjya

साहित्य –
दीड वाटी हरभर्‍याची डाळ
६-७ हिरव्या मिरच्या
चिमुटभर चिरलेली कोथिंबीर
१०-१२ लसूण पाकळ्या
३ चमचे लिंबाचा रस
३ चमचे साखर
चवीपुरते मीठ, मोहरी, हिंग, हळद
गव्हाचे पीठ मोहनासाठी
२  डाव तेल
तळणासाठी तेल

कृती –
आदल्या दिवशी रात्री हरभर्‍याची डाळ भिजत घालावी. दुसर्‍या दिवशी सकाळी डाळ, हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या एकत्र करून मिक्सरवर वाटाव्या.

वाटलेली डाळ कुकरच्या भांड्यात घेऊन ४-५ शिट्ट्या देऊन शिजवून घ्यावी. शिजलेली डाळ ताटात गार करत ठेवावी. गार झाल्यावर हाताने मोकळी करून त्यात साखर आणि मीठ घालावे.

कढईत डावभर तेल गरम करून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात उरलेला लसूण चिरून घालावा. नंतर डाळ घालून मध्यम गॅसवर परतावे. गॅस बंद करून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सारखी करावी.

कणकेत गरम तेलात मोहरी मीठ घालून कणीक घट्ट मळावी. त्याच्या पुर्‍या लाटाव्या. पुरीच्या मध्यभागी चमचा दीड चमचा डाळीचे सारण घालून त्याला करंजीचा आकार द्यावा.

गरम तेलात करंज्या तळाव्या. दह्याच्या चटणीबरोबर सर्व कराव्या.

सौ. निलिमा प्रधान

Avatar
About सौ. निलीमा प्रधान 24 Articles
सौ. निलीमा प्रधान या खाद्यसंस्कृती, वास्तुशास्त्र आणि इतर अनेक विषयांवर लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..