भारतीय पत्रकारीचेचा पाया रचणाऱ्या ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन..
‘निर्भिड पत्रकारिता’ या शब्दाला बट्टा लावण्याचं पातक अगदी गेल्याच वर्षी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर या एका मराठी संपादकाकडून घडलं आणि बाळशास्त्री, टिळक, गांधी आदिंलारख्या निर्भिड आद्य पत्रकारांची मान शरमेने वर स्वर्गात खाली गेली असावी या बाबत निदान माझ्या मनात तरी काही शंका नाही..बाळशास्त्रींना तर ‘याचसाठी केला होता का अट्टाहास’ असही वाटलं असण्याची शक्यता आहे.
‘मदर तेरेसां’वर लिहीलेला अग्रलेख कोणाच्यातरी दबावाची ‘भिड’ राखून दुसऱ्याच दिवशी कुबेरांना बिनशर्त मागे घ्यावा लागल्याचं हे देशपातळीवरचं स्वातंत्र्येत्तर व कदाचित स्वातंत्र्यपूर्व काळातीलही एकमेंव उदाहरण असावं. मराठी माणसाचा असाही एक विक्रम आहे हे किमान मी तरी विसरलेलो नाही.
केवळ या एका प्रकरणामुळे सबंध पत्रकार जगताचीच प्रतिष्ठा व इभ्रत धोक्यात आली हे कोणीही सुबुद्ध माणूस नाकारणार नाही..
आजच्या पत्रकार दिनी पत्रकारीतेची ती गेलेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करण्यास तमाम पत्रकारांना यश लाभो येवढीच शुभेच्छा सर्व पत्रकार बंधू-भगिनींना देण्यास आवडेल..बाळशास्त्रींनी खऱ्या अर्थाने ही मानवंदना असेल.
— नितीन साळुंखे
Leave a Reply