सुमारे १५० वर्षांपूर्वी, डार्विनने ‘मानवाचे पृथ्वीवर अवतरण’ हे पुस्तक लिहिले आणि जगभर खळबळ उडवून दिली. विशेषतः ख्रिस्ती धर्मियांना त्याचा सिद्धांत अजिबात रुचला नाही. त्याला प्रखर टीकेला तोंड द्यावे लागले.
डार्विनचा उत्क्रांतिवाद, केवळ जीवशास्त्रापुरता मर्यादित नसून धार्मिक मूल्ये, धर्म विचार मानवी मूल्ये, नैतिक मूल्ये इत्यादी अनेक विषयांवर दूरगामी परिणाम करणारा ठरला. डार्विनची पत्नी कट्टर धार्मिक असल्यामुळे, स्वतः डार्विनने त्याबाबतीत भाष्य करण्याचे टाळले. त्याच्या मित्राने हा सिद्धांत जाहीर केला.
या सिद्धांतानुसार, आत्म्याचे अमरत्व, मानवाचे इतर प्राण्यापासूनचे वेगळेपण, परमात्मा, आत्मा, ईश्वर वगैरे धार्मिक संकल्पनांना वेगळा अर्थ प्राप्त करून दिला. ईश्वराने मानवाची निर्मिती केली नाही, तो सजीव सृष्टीचाच एक घटक आहे हे सिद्ध केले. या सिद्धांतामुळे आनुवंशिकशास्त्र, जनुकशास्त्र, जनुकीय अभियांत्रिकी वगैरे शास्त्र शाखा निर्माण झाल्या.
सजीवांच्या आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होते असे डार्विनने सिद्ध केले असले तरी पृथ्वीवर सजीव कसे निर्माण झाले हे अजून कुणालाही निर्विवादपणे सांगता आले नाही.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply