गोविन्दादधिकं न दैवतमिति प्रोच्चार्य हस्तावुभौ-
वुद्धृत्याथ शिवस्य संनिधिगतो व्यासो मुनीनां वरः ।
यस्य स्तम्भितपाणिरानतिकृता नन्दीश्वरेणाभव-
त्तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि ॥ ५॥
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान शंकरांच्या एका आगळ्यावेगळ्या काहीशा गमतीदार लीलेचे वर्णन करीत आहेत. त्यातही ती लीला भगवान शंकरांनी स्वतः केली नसून त्यांचे गण श्रेष्ठ असणाऱ्या श्री नंदींनी केलेली आहे. अर्थात त्या नंदींच्या मागे भगवान शंकरांचे बल कार्य करीत असल्याने शेवटी ती भगवान शंकरांची लीला आहे.
या गमतीदार प्रसंगाचे वर्णन करताना आचार्य म्हणतात,
गोविन्दादधिकं न दैवतमिति प्रोच्चार्य हस्तावुभा- वुद्धृत्याथ शिवस्य संनिधिगतो व्यासो मुनीनां वरः – आपले दोन्ही हात उंच उभारुन, भगवान विष्णूंच्या पेक्षा मोठे कोणतेही दैवत नाही, अशी मोठ्याने गर्जना करीत महर्षी वेदव्यासांसमान श्रेष्ठ महर्षी भगवान शंकरांच्या जवळ गेले.
यस्य स्तम्भितपाणिरानतिकृता नन्दीश्वरेणाभव:- मात्र नंदीने आपल्या दिव्य सामर्थ्याने त्यांचे ते वर उचलले हात तसेच जखडून ठेवले. त्यांना हात खालीच घेता येईना.
भगवान विष्णूची स्तुती करून देखील ते हात खाली आले नाही असा भाव. अर्थात ज्या भगवान शंकरांच्या गणांची इच्छा भगवान विष्णू देखील मोडत नाहीत.
या श्रेष्ठत्वामुळेच हर हर महादेव ! म्हणतांना दोन्ही हात वर करून ज्यांच्या महनीयतेचा गौरव केला जातो.
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि – त्या भगवान शंकरांच्या ठिकाणी माझे मन सुखाने रममाण होवो.
Leave a Reply