दयाघना नको आता पुन्हा येरझार।।धृ।।
ध्यास! केवळ आता तव दर्शनाचा
सुखावला या जन्मी जीव हा अपार
भोगले भोग, सारेसारे गतजन्मांचे
जगन्नाथा! नको आता पुन्हा येरझार।।१।।
सांगशील कां ? तूं रे जगतनियंत्या
सत्य! तुजविण दूजे कोणते सुंदर?
धावलो संसारी सदैव मृगजळापाठी
जगन्नाथा! नको आता पुन्हा येरझार।।२।।
सत्य त्रिलोकी! तुझीच सत्ता केवळ
सृष्टीतही साक्षी, तुझेच रूप निरंतर
अविरत स्मरण, तुझेच या स्पंदनात
तुझ्या नामात सुखावतो जीव चिरंतर।।३।।
मुक्ती, मोक्ष, स्वर्ग सारे तुझ्याच ठाई
या युगी भौतिक सुखात दंगले चराचर
वोखटी! प्रीती, भक्ती, वात्सल्य सारे
उबगलो इथे आता, नको पुन्हा येरझार।।४।।
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१४६.
९ – १२ – २०२१.
Leave a Reply