दयावंताला पाझर फुटला ,
पक्षी पिंजऱ्यातून सोडला,
विहंगम तो आनंदला,
भरारी घेऊनी, उडाला,–!!!
निळे आसमान ते,
खुणावत सारखे होते,
पिंजऱ्याच्या बंधनाला,
मूक मन झुगारत होते,–!!!
कोण येईल पुढे अन्
स्वातंत्र्य देई मजला,
देवाचा दूतच तो,–
मज तेव्हा तो वाटला—!!!
कोण आहे त्राता माझा,
मज स्वातंत्र्य देणारा,
वाट पाहतो जीव सारखा,
उडायाला आसुसला,–!!!
बोलावे मज हिरवी धरा,
झाडे वृक्ष वेली लता,
प्राण येथेच सोडेन मी,
इथून सुटका नसतां–!!!
दुःख माझे कोण जाणेल,
हात देईल मदतीचा,
जागेत संकुचित या,
जीव घुसमटे हो माझा,–!!!
कोण आला जवळी हा,
दरवाजा उघडे पिंजऱ्याचा,
माणूस निष्ठुर भारी ना,
नको, नको रे धरू बाबा,–!!!
घेऊन कुठे चालला हा,–?
निघाला का मारावया,
भीती वाटे मज फार,
मारतील धरून गळा,–!!!
मी मागे थरथरत उभा,
काळीज हाले लपालपा,
दयावान तो पुढे येता,
दार उघडतो बघतां-बघतां,–!!!
बाहेर येता जीव थोडा,
जागचा की हाललो,–
उडालो सरळ गगनांतरी,
घेतली मोठीच भरारी
देवा त्याचे कल्याण करी,
हीच विनंती तुज खरी,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply