ओडीसा राज्याचे पश्चिम टोक आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या प्रदेशात पसरलेला विभाग म्हणजे दंडकारण्य ज्यातील बराच भाग आजकाल नक्षलवादीनी व्यापलेला आहे
रेल्वेने १९६३ च्या सुमारास या खडतर विभागातून ११० किमी अंतराची कठिण रेल्वे लाईन बांधली. हा मार्ग बांधण्यात जपानने मोलाची मदत केली होती.
डी.- कोट्टावळसा ते किरणडूल
बी.- संबळपूर ते टीटलाघर
के.-बिमालाघर ते कीबरुक
समुद्रसपाटी पासून सुरु होणारा हा मार्ग अनंतगिरी घाटमार्ग पार करत अराकू हिल स्टेशन पर्यंत गेलेला आहे. ओडीसा मधील बायलदेल्ला येथील आयर्न ओअर खाणीतून किरणडूल येथून कोटावळसा मार्गे विशाखापट्टणम बंदराला जोडलेला हा रेल्वे मार्ग आहे.
रेल्वे मार्गाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वात तीव्र वळणे ८० व सर्वात तीव्र चढण १:६० असे ठेवावे लागते. या मार्गावरील बहुतेक चढाव व वळणे इतकी तीव्र आहेत. मार्गात ५९ बोगदे, शेकडो छोटे मोठे पूल असून ते बांधताना कैक कोटी घनमीटर माती व दगड उपसले गेले. ते उचलण्याची जबाबदारी आंध्र प्रदेशातील एका विविक्षित जमातीच्या कामगारांनी घेतली होती. ते त्या कामात निपुण होते.
१९६२ सालात बांधण्यात आलेल्या या मार्गाच्या कामावर प्रसिद्ध इंजिनियर रमाकांत विद्वांस होते. त्यांच्या आठवणी ‘मुसाफीरीच्या आठवणीत’ या त्यानी लिहिलेल्या पुस्तकात आहेत.
या कामावर त्या भागातील १००० च्या वर आदिवासी जमातीचे लोक कामावर होते. त्या जमातीच्या तंत्राने वागणे एक दिव्यच असे. जंगलात बांधलेल्या एका वसाहतीत हे सर्व अधिकारी राहत असत. सर्व बाजूनी इतके घनदाट जंगल होते की वसाहती भोवती वाघ, बिबटे, अस्वले मुक्तपणे दर्शन देत. घरी राहणाऱ्या बायकांनासुद्धा याची सवय झाली होती.
हा रेल्वे मार्ग बांधणी म्हणजे इंजीनियरिंगचा एक पराक्रम म्हणून त्याकडे पाहिले जाते. या मार्गाच्या उद्घाटन प्रसंगी पहिल्या गाडीबरोबर लेखकाने प्रवास केला होता. प्रत्येक खेड्यातील आदिवासीनी हारतुरे घालत सर्वांचे स्वागत केले होते. खडा चढ व तीव्र बाकदार वळणे यामुळे या मार्गावर लोखंडाच्या भुकटीने भरलेली ४० डब्यांची मालगाडी चालवणे एक आव्हानात्मक काम आहे. एकेका गाडीला ४ ते ६ इंजिने लागतात. या मार्गावर खास धातूपासून बनविलेली गाडीची चाके व रूळ वापरावे लागतात.
दरवर्षी दीड कोटी टन आयर्न ओअर विशाखापट्टणम बंदरातून जपान व भारतातील एस्सार व विक्रम इस्पात कंपनीना पुरविले जाते. हा मार्ग रेल्वे उत्पन्नाचा महत्वाचा हिस्सा आहे..
— डॉ अविनाश वैद्य
Very nice article