मुख्यमंत्री साहेब आपण गुन्हेगारच आहात….
आपण मुख्यमंत्री झालात हाच आपला पहीला गुन्हा. आपण साखरसम्राट नसताना असं धाडस केलंच कसं? साखरसम्राट होऊन नको त्या कारणानी टनामागे शेतकर्याचं शोषण केलं नाही हा आपला दुसरा गुन्हा
गबर बागाईतदार शेतकरी वर्षानुवर्षे जिराईतदार शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे भान्डवल करून त्यांच्या टाळुवरचं लोणी खात आहेत.हे आपण ओळखले हाही गुन्हाच!शेतकर्यांना कर्ज माफ करण्याच्या नावाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सहकारी बँका आपलं उखळ पांढरे करुन घेतात हे आपल्या चाणक्ष नजरेतुन सुटले नाही हा काय लहानसा गुन्हा आहे?
शेतकरी कायमचा कर्जमुक्त व्हावा या साठी तात्कालिक उपाययोजने ऐवजी दिर्घकालिन उपाययोजना अवलंबल्या हा काय गुन्हा नाही?सर्व सवलती आँनलाईन करून भुरट्या गबर शेतकऱ्यांना पायबंद घातला हाही गुन्हाच.
साहेब, तुम्ही शेतकऱ्यांना लुटणार्या मार्केट कमीटी आणि दलालाची मक्तेदारी संपवण्याचा प्रयत्न करता हा गुन्हा कसा खपुन घ्यायचा?
तुमच्या कार्यकाळात बाजार भाव कमी मिळाले ही बाब टाळता आली असती तर बरे झाले असते ,हे खरे असले तरीही कांदा घाटात फेकला आणि टोमॅटोचा खच रस्त्यावर पडला तेव्हा ज्यांचे राज्य होते अन धरणात लघुशंका करणारे गादीवर विराजमान होते .त्यांचे काय ? हा प्रश्न विचारायचा नसतो.त्यांना सोडाहो त्यांना सगळं माफ आहे.
तुम्ही मात्र विक्रमी तुर खरेदीचाही गुन्हा करता वर घोटाळा करणार्या व्यापार्यांवर कारवाई करता! हे काही बरे नाही.
तुमचा अपघात झाला ,आम्हाला बरे वाटले .तुमच्या मरणावर टपलोच होतो. दुसरा असता तर अपघाताने हबकुन गेला असता .तुम्ही मात्र लगेच कामाला लागलात. याला काय अर्थ आहे?अजूनही एकही घोटाळा केला नाही ,हा गुन्हाच.
तुम्ही ५ वर्षे राहीलात तर गरीब शेतकर्याचे प्रश्न कायमस्वरूपी मिटवाल ही भिती वाटते .या गुन्ह्याला शिक्षा हवीच साहेब, असे अनेक गुन्हे करीत रहा हीच विनंती
— संकलन : शेखर आगासकर
सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम . लेखकाचे नाव मला माहित नाही.
Leave a Reply