विजय मल्ल्या यांची ” किंगफिशर एरलाइन” एकदम फॉर्म मधे असण्याचा तो काळ होता . त्यात मिळणाऱ्या उत्कृष्ट सेवेमुळे प्रवासी खुष होते . त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचाही सल्ला अनेकजण देत होते . मी मात्र त्याच्याशीबिलकूल सहमत नव्हतो . मला माझे अनेक मित्र – सहकारी – वाचक – श्रोते ते शेअर्स तेंव्हा खरेदी करावे का म्हणून अनेकदा , अगदी सतत , विचारत होते . आणि मी ” माझे मत तरी नाही असॆ आहे . याउपर पैसे आणि निर्णय तुमचाअसल्याने खरेदी करायची तर करा ” असे उत्तर देत असे .
त्यावर वैतागून एकदा माझ्या तरुण सहकाऱ्यांनी मला घेरावच घातला . ” मी किंगफिशर बाबत पूर्वग्रहदूषित आहे का ? ” , ” विजय मल्ल्या मला आवडत नाहीत का ? ” ” त्यांनी मला किंगफिशर चे प्रसिद्ध कॅलेंडर दिले नाही का ? ” “आणि म्हणून मी किंगफिशर चे शेअर्स घेऊ नाहीत असे सांगतो का ? ” अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली . मी हसून वेळ टाळण्याचा खूप प्रयत्न केला . पण ते काही पिच्छा सोडेनात . त्यामुळे शेवटी मी त्यांना सांगितले की मला हे शेअर्सखरेदियोग्य वाटत नाहीत . त्यांनी त्यामागचे कारण विचारले . तेंव्हा मी त्यांना म्हणले की तुम्ही पेपर्स वाचत नाही का ? वर्तमानपत्राचा कोणता भाग हा त्यावर त्यांचा पुढचा प्रश्न . ” सीने जगताविशयि ची पाने ” या माझ्या उत्तराने त तरअक्षरशः चक्रावले . तेंव्हा एक सुप्रसिद्ध सीने अभिनेत्री आणि किंगफिशर च्या विजय मल्ल्या यांचा मुलगा यांच्या ” मैत्रीची ” चर्चा रंगात होती .
माझ्या आधीच्या उत्तराने गोंधळून गेलेल्या तरूण सहकाऱ्यांना त्याचा संदर्भ देत मी म्हणले की ” माझा त्या अभिनेत्री वर जास्त विश्वास आहे . तिचे आणि सिद्धार्थ मल्ल्या यांचे बिनसले अशी काही वर्तमान पत्रात बातमी फिरत आहे . हेबिनसन्याचे खरे कारण काही वेगळे असेल ; पण त्याचा एक अर्थ आता किंगफिशर मधे Profitability ही राहिली नसावी आणि Liquidity ही राहिली नसावी . किंवा तीला ही मंडळी संबंध राखण्याजोगि वाटली नसावी . ही अभिनेत्री इतकीसमन्जस , हुशार , चाणाक्ष आहे की मला तिच्या gut फीलिंग बद्दल खात्री आहे . त्यामुळे मला या समूहातील कंपनीचे शेअर्स खरेदियोग्य वाटत नाहीत . ”
माझ्या या उत्तराने माझ्या सहकार्यान्चे समाधान झाले की नाही आणि त्यांनी किंगफिशरच्या शेअर्सची तेंव्हा खरेदी केली की नाही हेही मला माहीत नाही .
पण अशा बादरायण कारणातून आपण आपल्या गुंतवणूकीबाबत निर्णय घेऊ शकतो . असे अपारंपारीक घटक, अप्रचलित अशी विश्लेषणाची तर्हा अनेकदा फार उत्तम संदर्भ ( आपल्या सोप्या मराठीत Clues हो ) देऊन जातात . आपणत्यांचा योग्य आणि वेळच्या वेळी उपयोग करण्याचे धाडस दाखवतो का हा खरा प्रश्न आहे .
असा काहीसा अपारंपारीक विचार आपल्या गुंतवणुकीबाबत करायचा झाला तर आपण प्रसिद्ध सीने अभिनेत्री दीपीका पदुकोन सारखे असावे असे मला अनेकदा वाटते . आजपर्यंत प्रसार – माध्यमांनी तिचे नाव निहार पंड्या ते रणवीर सिंगपर्यंत कितीजणांशी जोडले . पण ते खरे आहे की खोटे याबाबत ती कधीही एक चकार शब्द जाहीरपणे बोलत नाहि . तिचा हा संयम आपण आपल्या गुंतवणुकीला उपयोगात आणू शकू का ? जर हे खरे आहे असे क्षणभर मानले तर इतक्यामोकळेपणाने आपण गुंतवणूकीची इतकी साधने उपलब्ध असतात त्यांचा साधक – बाधक विचार करतो का ?
दीपीका पदुकोन आणि रणबीर कपूर यांचे प्रेमप्रकरण आणि मग विभक्त होणे याचीही चर्चा प्रसार – माध्यमात रंगली होती . पण त्याचा परिणाम स्वतःच्या कारकीर्दीवर होऊ न देण्याची खबरदारी दीपीका पदुकोन ने उत्तम प्रकारे घेतली .अगदी रणबीर कपूर बरोबरच्या सिनेमात काम करतांनासुध्दा . यांतून योग्य तो बोध घेत आपले भावनिक विश्व आणि व्यावसायिक निर्णय यांत गल्लत न करण्याची व्रुत्ती आपण अंमलात आणणार का ? एकंदरीतच व्यावसायिक क्षेत्रात ,आणि त्यातही विशेषतः गुंतवणूक क्षेत्रात यशस्वी रित्या कार्यरत होण्यासाठी या गुणांची अत्यंत आवश्यकता असते .
दीपीका पदुकोन या अभिनेत्रीचा गुंतवणूक क्षेत्रासंबंधी विचार करावा असे मला वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे काही काळापूर्वी तिच्या अभिनयापेक्षा तिच्या शारीरिक सौंदर्याचे अनुचित चित्रण एका नामांकीत चित्रं – वाहिनिने केले .दीपीका पदुकोन सिनेस्रुश्तित कार्यरत असूनही तीने त्या वजनदार समूहांच्या वाहिनीला ज्या पध्दतीने फैलावर घेतले त्याला तोड नाही . असे वागायला धाडस लागते . स्वतःच्या decency ची चाड लागते . आणि प्रचंड आत्मविश्वास आणिस्वतःच्या हक्कांविशयी जागरूकता लागते . आपण गुंतवणूकदार अशी जागरूकता , धाडस , आत्मविश्वास आपल्या गुंतवणूकदार म्हणून असणाऱ्या हक्कांबाबत कधी दाखवणार ?
दीपीकाने अगदी अलीकडे अतिशय मोकळेपणाने तिला आलेल्या औदासिन्याबाबत ज्या पध्धतिने चर्चा केली ते तर केवळ स्तिमित करणारे आहे . अतोनात मनोबल हवे त्यासाठी ! आपण गुंतवणूकदार स्वतःच्या गुंतवणूकीबाबत विचारकरतांना इतक्या मोकळेपणाने निदान विचार , अगदी स्वतःशीच तरी करू शकतो का ? करतो का ? त्याची आवश्यकता सतत जाणवत असताना तरी ? कारण गुंतवणूक क्षेत्र , त्यातही विशेषतः शेअर – बाजार हे क्षेत्र असे आहे की तिथेभल्या – भल्यान्चे निर्णय चुकू शकतात . अशा चुकलेल्या निर्णयाने आर्थिक नुकसान ही होऊ शकते . तुमच्या – माझ्यासारख्या सर्वसामान्य लहान गुन्तवनुकदारान्ची अशी आर्थिक क्षमता मुळातच बेताची असते . त्यामुळे असा धक्का सहनकरणे कठीण जाते . पण अनेकदा आपण त्यातच गुरफटून पडतो . दीपीका ने जाहीरपणे स्वतःच्या डिप्रेशनची कबूलि दिली . अगदी तीही आपणहून . आपण निदान स्वतःशीच ते मान्य करून आपला निर्णय दुरुस्त करणार की नाही ? तसेचअशी चूक आपल्या हातून पुन्हा होणार नाही अशी खबरदारी बाळगणार ना ?
दीपीका जशी स्वतःला कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेत सहजतेने पेश करत राहते आणि तरीही ती कधीही cheap वाटत नाही ; तसे आपण गुंतवणूक क्षेत्राची स्थिति काहीही असली तरी स्वतःला सावरून घेतो का हाही एक प्रश्नच आहे नाहीका !
प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या हातून काही महिन्यान्पुर्वी पारितोषिक स्वीकारताना दीपीका ने तिचे वडील नामवंत खेळाडू प्रकाश पदुकोन यांनी तीला लिहिलेले पत्र वाचून दाखवले होते . अशी आचार – संहिता आम्ही आमच्या गुंतवणुकीला लावूशकलो तर ?
दीपीका , तुझे हे रूप पाहिले ना की तू भारतीय बॅडमिंटन चा पहिला चम्पियन , ऑल इंग्लेंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय सुस्वभावी प्रकाश पदुकोन ची मुलगी आहेस हे मनोमन सुखावत राहते . अशी पिढीजात सम्रुध्धीआमच्या वाट्याला आमची पुढची पिढी आणि गुंतवणूक क्षेत्र . . . .
दीपीका , तू माझी आवडती अभिनेत्री असण्यात तुझ्या अभिनय – सौंदर्य – व्यक्तिमत्व याच्या बरोबरीने याही गुणांचा समावेश आहे ग ! आणि म्हणून तर तुझी तुलना आपल्या गुंतवणूक क्षेत्राशी करण्याचा मोह आवरता नाही आला मला.
चंद्रशेखर टिळक
४ सप्टेंबर २०१६ .
C – 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ .
राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व ) .
पिन . . . ४२१२०१ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
E-mail . . . tilakc@nsdl.co.in
Leave a Reply