नवीन लेखन...

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे झाला. तिचे लूक्स हे आजच्या पिढीतील मुलींना भावणारे आहेत. लाखो मुलींसाठी ती स्टाईल दीवा तर आहेच पण अनेकजणी तिची ही स्टाईल फॉलोदेखील करतात. दीपिकाने बॉलिवूडमध्ये ‘ओम शांती ओम’ सिनेमामधून पदार्पण केले. हा सिनेमा २००७ मध्ये रिलीज झाला होता. तिला पहिल्याच सिनेमात बॉलिवूड किंग खानसोबत काम करायची संधी मिळाली. हा सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर दीपिकाच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धूम घातली. दीपिकाने अनुपम खेर यांच्या अॅयक्टिंग इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आणि शामक डावर यांच्याकडून डान्स शिकली. दीपिकाचा ‘ऐश्वर्या’ हा कन्नड भाषेतील पहिला सिनेमा होता. आज ती आज बॉलिवूडमधील एक प्रसिध्द अभिनेत्री असून २००६ मध्ये ‘फिमेल मॉडल ऑफ द इयर’ आणि ‘फ्रेश फेस ऑफ द इयर’चा मान पटकावला. ‘ये जवानी है दिवानी’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, आणि ‘गोलियों की रासलीला-रामलीला’, हॅपी न्यू ‘इयर’, ये जवानी है दिवानी, पिकू, रामलीला, बाजीराव मस्तानी हे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी दीपिका. हे तिचे हिट ठरलेले सिनेमे. दीपिका प्रसिध्द बॅटमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे आणि तिची आई उज्वला एक ट्रॅवल एजंट आहेत. दीपिकासुध्दा एक बॅटमिंटन खेळाडू आहे. ती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बॅटमिंटन आणि बेसबॉस खेळली आहे. बंगळूरु येथून शालेय शिक्षण आणि माउंट कॅरमल महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. जेव्हा ती पदवीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिला मॉडलिंगची ऑफर आली होती. तिने मॉडलिंग एक छंद म्हणून केली, परंतु नंतर तिने या छंदाला गांभीर्याने घेतले आणि अनेक जाहीरातीत ती झळकली. म्हटले जाते, की दीपिकाला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार फिल्म इंटस्ट्रीमध्ये येण्याचा तिने कधीच विचार केला नव्हता. परंतु आज ती यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील आहे. सांगायचे झाले तर, तिचे नाव अनेक लोकांसोबत जोडण्यात आले आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..