बदलत गेलो घरे मी माझी,
आज पावतो कितीक तरी ।
पोटासाठीं नोकरी करतां,
भटकत होतो आजवरी ।।
बालपण हे असेंच गेले,
फिरता फिरता गावोगावी ।
वडिलांची नोकरी होती,
धंदा करणे माहीत नाही ।।
पाऊलवाट तीच निवडली,
मुलाने देखील जगण्यासाठी ।
तीन पिढ्या ह्या चालत राही,
एका मागून एकापाठी ।।
गेले नाहीं आयुष्य सारे,
स्थिर राहूनी एके जागी ।
देश वेळ आणि घरे निराळी,
जगलो होतो विविध अंगी ।।
शरीर देखील असेच आहे,
आत्म्याचे ते छोटे घरकुल ।
मिळवित असतां सत्व तेज ते,
देह सोडूनी दूजात जाईल ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply