नाकासमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा ।
थंड हवा आत जाते, गरम होवून बाहेर येते ।।१।।
अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून ।
भात्यापरि फुगते छाती, हवा आत खेचूनी घेती ।।२।।
आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते ।
भावना जेव्हां जागृत होती, रोमरोमी पुलकित होते ।।३।।
अवयवे सारी स्फूरुनी जाती, देहामधूनी विज चमकती ।
धनको ऋणको विद्युत साठे, अलग अलग दिसती मोठे ।।४।।
विजातीय लिंग येता जवळी, परिणाम दिसे विजेचा त्यावेळी ।
प्रकाश आहे आपल्या देही, ज्ञानीजन तो सहज पाही ।।५।।
स्थिर करूनी चंचल मना, प्रकाश दिसेल हृदयी सर्वांना ।
उष्णता वीज प्रकाश शक्ती, निसर्गाची रूपे असती ।।६।।
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply