वेधशाळेनी हलक्याहून अधिक आणि मध्यमहून कमी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केलाय म्हणजे नक्की काय याचा मथितार्थ माझ्याही आधी आमच्या एरीयातील डासांना कळला आणि त्यांनी अक्षरशः हैदोस घातला. मानवीडंखासाठी आसुसलेले त्यांचे दात शिवशिवायला लागले.
करssकर आवाजानी मला जाग आली आणि उठुन पाहिल तर त्यांच्यातलेच दोघ, लहानपणापासुन एकत्र वाढलेले आणि सध्या रीलेशनशिपमधे असलेले, एक वाग्दत्त वर आणि त्याची वाग्दत्त प्रेयसी यांनी माझ्या खिडकीला बसवलेल्या नेटलॉन जाळीला भेदुन माझ्या शयनगृहात अनाधिकृत प्रवेश करायचा घाट घातला होता.
मी हूं का चूं केल नाही आणि अँक्शनपेक्षा निरीक्षणावर भर दिला. स्त्रीसुलभ ईकारान्तातल्या गुणगुणण्यावरुन डासीण डेंग्यी स्पेशालिस्ट ओळखण सोप गेल आणि अर्थातच आकारान्तात गुणगुणणारा टग्या वाग्दत्त वरडास मलेरीया स्पेशालिस्ट असणार हे स्पष्ट झाल. वर वार पहाता गुण्यागोविंदातल हे गुणगुणण सिझनच्या मुहूर्ताचा पहिला डंख मला कोणी मारायचा या विषयी असाव या शंकेनी मी सावध पवित्रा घेतला. एकवरचा बारिक पंखा चारपर्यंत मोठा केला आणि पहाता पहाता दोघही पाय लाऊन पळुन गेले पण येताना पाडलेल एंट्रीच छिद्र विसरुन एग्झिटसाठी प्रत्येकी एक छिद्र पाडुन निसटले. मी नेटलॉन बदलल!
सध्या ही जोडी उपाशीपोटी पुणे मुंबई परिसरात धुमाकुळ घालतीय अस कानावर आहे तेंव्हा जरा जपून…
— प्रकाश तांबे
8600478883
Leave a Reply