नवीन लेखन...

डेनीस ब्लोश — दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

डेनीस ब्लोशचा जन्म पॅरिस मध्ये २१ जानेवारी १९१६ रोजी पॅरिस येथे एका ज्यू कुटुंबात झाला.तिला तीन भाऊ होते. १९४० मध्ये त्यापैकी दोन भाऊ व वडील फ्रेंच लष्करात होते.  त्यांना १९४० मध्ये जर्मनांनी तुरुंगात टाकले.ती,तिची आई व एक भाऊ तुरुंगवास टाळण्यासाठी खोटी ओळख व कागदपत्रे मिळवून  भूमिगत आयुष्य जगत होते. जुलै १९४२ मध्ये त्यानी जर्मनांच्या ताब्यातील फ्रांस मधून विनसी फ्रांस मध्ये पलायन केले.तिथे तिची ओळख सिट्रॉन या ज्यू इंजिनियरशी झाली तो फ्रेंच क्रांतिकारी संघटना व एसओई संघटनेसाठी काम करत असे.  ब्लोशने स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या ब्रिटनमधील दुसऱ्या महायुद्धात सुरू केलेल्या गुप्तहेर संघटनेत प्रवेश घेतला. एसओईने तिला वायरलेस ऑपरेटर चे प्रशिक्षण दिले.

ती गुप्तहेर जॉर्ज स्टार याच्या बरोबर त्याला अटक होईपर्यंत रेडियो ऑपरेटर म्हणून काम करत होती..ती एसओईच्या एजंट बरोबर काम करू लागली.तिला पुन्हा लंडनमध्ये आणण्याचे ठरवले.ती पायरनेस डोंगररांगेतून, जिब्राल्टर प्रांतातून वाट काढत लंडनला पोहोचली. २ मार्च १९४४ रोजी एसओई एजंट रॉबर बेनोट बरोबर विमानातून फ्रांस मध्ये उतरवण्यात आले. १८ जून १९४४ रोजी ती व तिचा साथीदार बेनोस्त यांना सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी जर्मन सैनिकानी  अटक केली. तिला सेकसोनी येथील टोरगा तुरुंगात डांबण्यात आले. तिथे तिचे थंडी आणि कुपोषण यामुळे अतिशय हाल झाले. पुढे तिला रेवनबर येथील यातनातळा वर पाठवण्यात आले. ५ फेब्रुवारी १९४५ रोजी  तिला ठार करण्यात आले तेव्हा ती केवळ २९ वर्षाची होती.इंग्लंड कडून तीन व फ्रांस कडून तीन अशी तिला सहा मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले.

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..