।। सुराग्रजाय नम: देवदारूपत्रं समर्पयामि।।
हिमालयात अथवा अतिशीत वातावरणात अतिशय उंच वाढणारा हा वृक्ष आहे.हा कोनाकृती वृक्ष असून त्वचा उभ्या रेषा युक्त असून आडव्या दिशेने फाटलेली असते.पाने हिरवी,लांब,निमुळती,टोकदार ३-५ वर्षे टिकतात.फुले हिरवट पिवळी,गुच्छ युक्त स्त्री व पुरुष बीज एकाच वृक्षावर उगवते.फळ १०-१२ सेंमी लांब,८-१० सेंमी रूंद पिकल्यावर काळ्या रंगाचे व आत १ सेंमी लांबीचे त्रिकोण भुरकट रंगाचे बी असते.हे वृक्ष ६०० वर्षे जगते.
ह्याचे उपयुक्तांग आहे काण्डसार व तेल.
आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात:
ह्याची चव कडू असून हे उष्ण गुणाचे असते तसेच हल्का व स्निग्ध असतो.हा कफवात नाशक व पित्तकर असतो.
आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)देवदार व्रणातील स्त्राव व दुर्गंध नष्ट करायला उपयोगी आहे.
२)देवदारूचा लेप पोटावर लावला असता अडलेला वात पुढे सरतो.
३)आंत्रातील कृमी नष्ट करायला देवदारू उपयुक्त आहे.
४)सुजेवर देवदारूचा लेप फायदेशीर ठरतो.
५)दमा,सर्दी,खोकला ह्यात देवदारूचा चांगला उपयोग होतो.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply