दिर्घ श्वासोच्छ्वास करणे हा उपाय सगळे योगा वाले सुचवतात. पाच मिनिटे असे केल्यास बराचसा मोकळेपणा वाटतो असे म्हणतात. मला काही फारसा फरक पडत नाही या मुळे!
-तुम्ही जे काम करीत आहात, ते एकदम बंद करा , आणि दुसरे काही तरी करणे सुरु करा. मग ते एखाद्या मित्राला फोन करणे, मैत्रिणीबरोबर संध्याकाळची भेट ठरवणे, कट्टा गॅंग बरोबर एखादं गेटटूगेदर ठेवणे असे काही पण असू शकते.
अगदी काहीही न करणे हा पण एक उपाय बरेचदा मी करतो. थंडी असेल तर मस्त पैकी ब्लॅंकेट मधे गुरफटून एखादे पुस्तक वाचत बसणे ,मस्त उपाय आहे.
-पायात रेबॉक किंवा नायके चढवा, आणि निरुद्देश फिरणे सुरु करा. तुमच्या बिल्डींग मधून बाहेर पड्ल्या बरोबर जो कोणी समोर येईल त्याच्याकडे पाहून स्मित हास्य करा. शेजारचा कोणी समोर दिसलाच, तर पाच मिनिटे उगाच काही तरी गप्पा मारा, आणि शेवटी काहीच न ठरवता, केवळ रस्त्याने गर्दीचा भाग होऊन कुठे तरी चालत जाणे करून पहा.
-सृष्टीसौंदर्य न्याहाळत जाणॆ. हे जरी या कॉंक्रिट जंगलात शक्य नसले, तरी पण इतर ” प्रेक्षणीय” गोष्टी बऱ्याच असतात, जर लग्न झालेलं नसेल तर चांगली ’ स्थळं ” असतातच, त्यांचा शोध घ्या.
आइस्क्रीम, चाट, वगैरे गोष्टी जर आवडत असतील तर उठा, आणि त्या भैय्या कडे जाऊन या. आवडीची वस्तू खायला मिळाली की बराच शांत होतो मी स्वतः.
-घराजवळ बगिचा असेल तर बगिचा मधे चालत जा. नुसते बगिचा मधे बसलो, तरी पण छान वाटते. एखादी गोष्टीचे रुपांतर बीजांकुर पासून तर फुला- फळापर्यंत झालेले पहाणे हा पण एक मस्त अनुभव असतो.
-तुम्ही जर एखादी गोष्ट केलेली असेल की जिच्यामुळे तुम्हाला गिल्टी वाटत असेल, (जसे एखाद्या प्रिय व्यक्तीशी खोटे बोलणे), तर तो गिल्ट मनातून काढून टाका. गिल्ट ही कोळ्यांच्या जाळ्या सारखी असते, एकदा तुम्ही त्यात अडकला, की त्यातून बाहेर पडणे शक्य होत नाही.
-फोटोग्राफी ,ट्रेकिंग, वाचन, पेंटींग, पतंग उडवणे, वगैरे कुठला तरी छंद जोपासा. जास्त डिप्रेशन आले की छंद हा एक मस्त विरंगुळा होऊ शकतो. मी लहान असतांना तास अन तास गच्चीवर पतंग उडवत बसायचो. एखादे म्युझिकल वाद्य वाजवणे, खेळ किंवा इतर काही छंद असू शकतात. जिग सॉ पझल हजार पिसेसचे घेऊन या , मस्त वेळ जातो शांत जागी बसून मेडीटेशन करणे.
गरम बोर्नव्हिटाचा ग्लास संपवून मस्त पैकी झोप काढा. जस्ट रिलॅक्स! आवडीचे संगीत ऐकणे हा पण मस्त उपाय आहे. शक्यतो हेडफोन लावून गाणी ऐकल्यास लवकर आराम मिळतो. शक्यतो क्लासिकल संगीत जास्त बरे वाटते अशा वेळेस!
-आपल्याला स्ट्रेस जास्त येण्याचे कारण म्हणजे फायनान्स. आपल्या कुटुंबीयांची काळजी प्रत्येकालाच असते, कधी तरी एकदम आपल्याला जाणीव होते की आपण काहीच करून ठेवलेले नाही. हल्ली पूर्वी प्रमाणे लोकांना पेन्शन पण नसते, त्यामुळे आपल्या अपरोक्ष आपल्या कुटुंबाचे कसे होईल? ह्या गोष्टी मुळे डिप्रेशन येण्याचे प्रमाण फार जास्त आहे. यावर उपाय म्हणजे फायनान्शिअल प्लानिंग व्यवस्थित करून ठेवणे. टर्म पॉलिसी, ज्या मधे कमी इन्स्टॉलमेंट आणि जास्त रिस्क कव्हर असते ती काढणे. एफ डी वगैरे , इनव्हेस्टमेंट प्लानिंग करणे ..
-आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे काही तरी लिहा. जे काही मनात येईल ते लिहून काढा, एखादी खास वही, किंवा ऑन लाइन ब्लॉग तयार करा, की ज्यावर तुम्ही आपले मन मोकळे करू शकाल. मनात जे काह येइल ते लिहिलं की मानसिक त्राण कमी होतो, हे मी स्वतः अनुभवले आहे. ज्या गोष्टी कोणाशीच बोलता येत नाहीत, पण मनात येत असतात, आणि मग त्यांच्यामुळेच तुम्हाला डिप्रेशन येत असते. लिहून काढणे हा एक मस्त उपाय आहे-
असं म्हणतात, की जर एखादा माणूस कायम सिरियस राहिला, स्वतः कधी काही एंजॉय केले नाही, कायम कुठल्यातरी “अमूर्ताच्या शोधात” गुरफटला गेला तर तो स्वतःच्या नकळत वेडा ( सिझोफ्रेनिक ) होऊ शकतो. अशी मानसिक अवस्था आली की आत्महत्येचे विचार मनात येणे सुरु होते. म्हणून हे प्रकर्षाने टाळा.
-दिवसभरात , स्वतः साठी कमीत कमी एक तास काढून ठेवा. तो तुमचा स्वतःचा स्वतःसाठी दिलेला वेळ असेल. स्वतः बरोबर रहा- बी विथ युवरसेल्फ.’पॉझिटिव्ह थिंकींग” सुरु करा.
-इंटरनेट मुळे आपले घराबाहेर पडणे बरेच कमी झालेले आहे. स्वतः भोवती एक स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम तयार करा. त्या मधे , पत्नी, मुलं, मित्र, मैत्रिणी, शेजारी, असे अनेक लोकं असू द्या. जितके जास्त लोकं तुमच्या सपोर्ट सिस्टीम मधे, तितके सहज पणे तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर पडू शकता. दिवसभरात थोडा तरी वेळ काढा, तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्ती सोबत घालण्यासाठी. शक्यतो औदासिन्याच्या अवस्थेत एकटे रहाणे टाळा.
— सुषमा मोहिते
Leave a Reply