नवीन लेखन...

त्वचारोग – नायटे

नायटे निरनिराळ्या प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर, जांघेत, कमरेवर दगडफूलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यात त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य करणे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे इ. अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपड्याखाली नीट स्वच्छता राहत नाही. याठिकाणी खरुज, नायटा वाढतात. कडा असलेल्या गोलाकार स्वरुपात त्वचेवर उठणारा नायटा हा एक प्रकारच्या बुरशी, आळब्यासारख्या सुक्ष्म शेवाळामुळे होणारा रोग आहे. चामडीच्या कोणत्याही भागावर गोलाकार चट्टे उठतात. पण विशेषतः काखा, जांघा, बोटांच्या मधील भाग इ. नेहमी ओलसर राहणाऱ्या जागांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.

आपल्याकडे डोक्यामध्ये होणाऱ्या नायटाचे प्रमाण त्यामानाने कमीच आहे. कंबर व जननेन्द्रियाजवळील भागाला सुद्धा नायटा होतो. हे चट्टे गोलाकार असल्यामुळे त्यांना रिंग वर्म म्हणतात. त्यांना कमालीची खाज सुटते. जर हा चट्टा केसात झाला तर केस जावून तेवढया ठिकाणी टक्कल पडते आणि नखांवर झाला ते नखे वर उचलली जाऊन खरखरीत व वाकडी होता.

हा आजार कंबर, पोट, मांड्या, जांघा इ. भागात जास्त करून होतात. खूप खाज सुटते व नायटाची वाढ वेगाने होते. पण कातडीवर बधीरता मात्र नसते. नखे कापावीत.

नायटा झालेला भाग साबण व स्वच्छ पाण्याने रोज धुतला तर हा रोग बरा होतो.

हेक्झाक्लेरोफिन असलेल्या साबणाचा जास्त उपयोग होतो. घामाने भिजलेले सगळे कपडे नेहमी बदलावेत व स्वच्छ धुवून कोरडे असतांना वापरावे. नायटा झालेली जागा नेहमी स्वच्छ ठेवून ती सुर्यप्रकाशात राहील असा प्रयत्न करावा. १ भाग सल्फर व १० भाग तेल यांचे मिश्रण करून नायटा झालेल्या जागी लावावे. बाजारात मिळणारी नायटा, गजकर्ण विरोधी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

डोक्यात खवडे झाले असल्यास बाजारात मिळणारी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावीत. डोक्यातील नायटा पाण्याचा शेक देऊन तेथील केस उपटून वरील औषधांचा उपयोग करावा. नायटा व त्यासारखे चामडीचे बुरशीजन्य इतर विकार सांसर्गिक असल्यामुळे एकाकडून दुसऱ्याला चटकन होतात, ते टाळण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात.

नायटा झालेल्या रुग्णाला वेगळे झोपवावे.
एकच फणी व एकमेकांचे कपडे ( स्वच्छ धुऊन वाळविल्याशिवाय) वापरू नयेत.
नायटा झालेल्या रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार करावेत.
बाह्य उपचारांबरोबरच पोट सुद्धा साफ असणे गरजेचे आहे. त्वचा नेहमी कोरडी राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.

– – व्हॉटसऍप वरुन 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..