हे असे ‘ देव ‘ आहेत की त्यांना कोणी कधीच विसरू शकतं नाही त्यांनी आपल्याला ‘ आनंद ‘ देऊन समृद्ध केले.
देवआनंद यांचा जन्म २६. सप्टेंबर १९२३ रोजी गुरुदासपूर पंजाब जे आता पाकिस्तानात आहे तेथे झाला . त्यांचे वडील पिशोरीलाल आनंद व्यवसयाने वकील होते. देवआनंद यांचे खरे नाव धरमदेव आनंद असे होते . परंतु ते देव आनंद या नावाने ओळखले जात . देवआनंद यांनी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ लाहोर मधून बी.ए . इंग्रजी घेऊन केले. त्यांनी आपले करिअर करण्यासाठी घर सोडले आणि ते मुंबईला आले. त्यांनी चर्चगेट येथील मिलिटरी सेन्सॉरच्या ऑफिसमध्ये १८५ रुपये महिना नोकरी केली. त्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडून एक अकाऊंटनसच्या ऑफिसमध्ये ८५ रुपये महिना नोकरी केली आणि त्यांनी आपले बंधू चेतन आनंद याच्या बरोबर IPTA मध्ये गेले. IPTA म्हणजे इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन मध्ये गेले. देवआनंद याना प्रभातच्या बाबुराव पै यांनी प्रथम संधी दिली. बाबुराव पै यांनी देव आनंद यांना प्रभातच्या ‘ हम एक है ‘ ह्या चित्रपटात १९४६ साली संधी दिली. त्या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान त्यांची गुरुदत्त याच्याशी भेट झाली. त्याच्यामधील मैत्री जगजाहीर आहेच. त्यांनी असे ठरवले जेव्हा देव आनंद चित्रपटाचे निर्माते असतील तेव्हा तो चित्रपट गुरुदत्त डायरेक्ट करतील , तेव्हा देव आनंद त्यात काम करतील.
१९६० नंतर देव आनंद यांची इमेज रोमँटिक ऍक्टर म्ह्णून झाली. त्याचे असंख्य चित्रपट गाजले . त्यांचे बंधू विजय आनंद यांनी देखील त्याच्याबरोबर काम केले , त्या दोघांचा ‘ गाईड ‘ हा खूपच गाजला. त्यानंतर हरे राम हरे कृष्ण , जॉनी मेर नाम ..चित्रपटाची यादी खूप मोठी आहे. त्याच्या पत्नी कल्पना कार्तिक ह्या पण त्या काळात अभिनेत्री होत्या .
देव आनंद अगदी शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांना खूप पुरस्कार मिळाले. गाईड चित्रपटासाठी १९६५ साली नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाले , तर २००२ साली दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाले .त्यांनी निर्माता , अभिनेता , डायरेक्टर , नवकेतन फिम्सचा सहनिर्माता अशा अनेक प्रकारे काम केले. मला देव आनंद यां भेटण्याचा खूप वेळा योग आला. माझ्याकडे त्यांच्या अनेक स्वाक्षऱ्या आहेत. दोन स्वाक्षऱ्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोवर असून एक हिंदीत आहे तर एक इंग्रजीमध्ये .
३ डिसेंबर २०११ या दिवशी लंडनच्या द वॉशिग्टन मेफेअर हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply