ग्रहणामुळे निर्माण झालेला नैसर्गिक बदल, पृथ्वीवर पडणाऱ्या छाया-पडछाया. या बदलना प्रथम धार्मिक संकल्पनेचा मुखवटा दिला गेला होता. तो राहू, केतू, सूर्य चंद्र, पृथ्वी इत्यादी. लोकांचे भजन, पूजन स्नानादी क्रमे, प्रार्थना इत्यादी हे सारे प्रचंड प्रमाणात व नियमित होत होते. ज्ञानाची वाढ झाली, समज वाढवली, निसर्गाचे चक्र समजले. सारे सारे बदलू लागले. त्या कथांवरील विश्वास कमी होऊ लागला. लोक सत्य घटनेचा आधार मान्य करु लागले. अशाच अनेक संकल्पना देखील त्यांची उकल होऊन मान्यता प्राप्त होऊ लागल्या आहेत. ज्ञान, विद्वानानामुळे परिवर्तन होत असलेले जाणवते.
रानटी काळांत जेव्हा देवत्वाची प्रथम कल्पना कुणीतरी रोवली व ती मान्य होऊ लागली. तेव्हा एक वैचारिक परिवर्तन जाणवू लागले. सशक्त, ताकदवान लोकांनाच श्रेष्ठत्व दिले जाते व त्यांचा अधिकार शक्तीच्या जोरावर मानला जाई. प्रथमच हे घडले. अशक्त किरकोळ परंतु विचार संपन्न व ज्ञानसंपन्न अशा व्यक्तीला महत्त्व दिले जाऊ लागले. कारण त्यानेच त्या नैसर्गिक घटना वा चमत्कारावर भाष्य केले होते. सर्वाना अभय देण्याचा प्रयत्न केला होता. समोरच्या शक्तीपुढे विनम्र होण्याचे, रानटीपणा बाजूस करण्याचे पटविले होते आणि हे त्याकाळच्या तथाकथीत मुखीयांना पण पटले. त्यांनी मान्यता दिली. हे बघून सर्वजण त्या तथाकथीत विद्ववानाला आदर देवू लागले. नतमस्तक होऊ लागले.
हा वैचारिक बदल, समजण्याची संकल्पना ही त्यावेळच्या समजदार वा ज्ञानी जनांच्या लक्षात येवू लागली. शारिरीक बळ वा शक्तीपेक्षाही नवीन शोधलेला वैचारिक मार्ग हा त्यांच्यावरही श्रेष्ठत्व गाजवणारा असेल ही समज दृढ होऊ लागली. ज्ञानाचे मग त्यात विज्ञान असो वा जामाजिक, कौटुंबिक धारणा विषयी असो. पारडे जड होऊ लागले. सशक्त देखील अशक्तांना मान्यता देवू लागले. विचार व विषय वाढत जावू लागले. जितके विद्वान, तितकेच विषय व समज. लोक जागृती निरनिराळ्या मार्गाने होऊ लागली. सहज झाले असेल वा हेतूपरस्पर घडले असेल. मात्र जे घडले त्याने सामाजिक इतिहास स्थापन होऊ लागला. अशाच त्याकाळच्या तथाकथित विद्वान मंडळीनी अद्रष्य शक्तीच्या मान्यतेचा विचार दृढ करणे सुरु केले. त्याच संकल्पनेतून उत्पन्न झाले आदर तंत्र, विश्वास तंत्र, श्रद्धा योजना, पुजाअर्चा, भजन इत्यादी. मग सर्वच जण त्या अदृष्य शक्तीचे गुणगाण करु लागले. सर्वांचे भले करण्याची त्यामध्ये संकल्पना आहे हा विचार स्थापन होऊ लागला. चांगले विचार, भले विचार, संस्कार, प्रेम, आपलेपणा आणि अशाच अनेक बाबींचा उगम होऊ लागला. अनेक विचार अनेक संकल्पना, अनेक मार्ग हे निर्माण होऊ लागले. निरनिराळे विचार धारक ह्यात सहभागी होऊ लागले. नावे दिली गेली. प्रचार होत गेला.
प्रगती तरी समाधानकारक होती हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही. पण याचा मुळ गाभा होता श्रेष्ठत्व, अधिपत्य, सत्ता गाजविणे. जे शरिर शक्तीसामर्थ्याने इतरांना प्रभावित करीत होते. ते देखील अशा विद्वत्तापूर्ण विचारांना मान्यता देवू लागले. आदर देवू लागले.
Leave a Reply