समाज आज खूप प्रगती करीत आहे. पुरोगामी बनत चालला आहे. परंतु अशा अनेक विचारांची जी मुळे खूप अनेक अनेक वर्षापासून खोलवर रोवली गेली, ती समुळ नष्ट होणे फार अवघड. अज्ञानात सुख, कल्पनेतील आनंद, भित्र्या मनाला आधार, अनिश्चितेतच समाधान शोधनाचा प्रयत्न होत गेला.
कोणता विचार येथे रुप धारण करीत आहे. जीवनाचे, निसर्गाचे एक महत्त्वाचे ध्येय, श्रेष्ठत्व स्थापणे, अस्तित्वाची जाणीव, हेच. त्यावर श्रद्धा, कालचा विचार, आज पूर्ण वेगळा असेल. अत्यंत विचित्र वाटणाऱ्या, केवळ कल्पना करता देखील न येणाऱ्या सर्व संकल्पना आज सत्यात उतरत आहेत. देव संकल्पना अशीच असावी. कदाचित आपणच देव असूत. देवांच्या सर्व कृती, त्यांच्यावर थोपविली गेलेली अनेक पुराणकथा, ह्या मानवाला साजेशीच असतात. फक्त अनेक चमत्कार दिव्यशक्ती धारणा, ह्या कदाचित आज दिसत नसतील. परंतु प्रगत मानव तेही अनेक मार्गाने साध्य करु लागलेला दिसतो. ज्ञान हे volatile प्रमाणे असते. ते लहरी मध्ये प्रचंड वेग क्षमतेत असते. अस्तित्व रचना इत्यादीमध्ये आमुलाग्र बदल धारण करण्याची शक्ती प्राप्त. मनापेक्षाही प्रचंड ताकदीचे. मन हे देह शरीर माध्यमाचाच आधारावर राहते. मनाला जगण्यासाठी आधार हा शरीराचा. परंतु ज्ञानाला कसलाच आधार लागत नसतो. ते कोठेही, कोणाकडेही केव्हाही जाते, उलथापालथ करणे, वेगळेच होते. कुठले ज्ञान , कुठेही जाणे व त्याच देहातील ऊर्जा शक्तीचा आधार घेत वेगळीच रचना निर्माण करते. ज्ञान हे मनापेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ ठरते. माझे विचार, माझे ज्ञान हेच माझे मन म्हणतात. सत्य परंतु ज्ञान जेव्हा स्वतंत्र रुप धारण करते तेव्हा ते तुझे माझे कुणाचेच नसते. तेच तर मनावर देखील ताबा करते वा नष्ट करते.
ज्ञानाला तुमच्या शरिराची गरज नाही आणि मोह ही नाही. मनाला तशी गरज असते. म्हणूनच सर्वश्रेष्ठ ज्ञान. काही अंशी ते त्याला साध्य होत आहे. परंतु हे सारे आत्मघातकी ठरणारेच असेल. मानवाची वर्चस्वाची हाव मात्र वाढतच चाललेली आहे. त्याने अनेक क्लुप्त्या करुन आपण त्या निरगुण परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ होण्याचा आव आणला आहे. देवत्वाच्या कल्पना जर मानव प्रेरित असतील, तर त्या सर्व ज्ञान लहरी मधून उत्पन्न झालेल्या आहेत. ज्ञान हे मानवासाठी सदा अपूर्ण असलेले आहे. कारण हाच तर ज्ञानाचा मूळ गाभा आहे. त्यात फरक पडणे केव्हाही होणे नाही. मनावर ताबा करता येत नाही. कारण ही तेच आहे. ज्ञानाचे देखील तसेच नव्हे का. शिवाय मनाला माध्यम लागले. ज्ञानाला तर कोणतेच माध्यम लागत नाही. चांगल मनच चांगल्या ज्ञानाच्या सहकाऱ्यात राहू शकते. समाधान, शांततेचा तोच अंतीम उद्देश असेल.
मानव कोण आहे. ह्याचा विचार होताना, त्याच्या ज्ञानाचा विचार व्हावा, एका रानटी अवस्थेमधूनच तो प्रगत होत होत आजच्या आधूनिक जगातील प्रगतीचा कर्ता ठरला. जे कुणी विचार करु शकणार नाही. ज्या गोष्टीची फक्त वाच्यचा पौराणीक ग्रंथ संपदेत दिसून आली ते सारे काही हाच मानव आज आपल्या ज्ञान सामर्थ्याने करु पाहात आहे. पौराणिक ग्रंथामधील देवत्वाची कल्पना सामान्य मानव करु शकत नाही. ती दिव्य शक्ती ह्या देवदवतांना प्रदान केली होती. अर्थात त्यांच्याच ज्ञान सामार्थ्याने कित्येक तथाकथीत आश्चर्यकारक घटना होत गेल्या. त्यांची वर्णने ऐकून आम्ही अंचबित होऊ लागलो. कारण त्या गोष्टी मानव शक्तीच्या क्षमतेच्या खूपच भिन्न होत्या. मानव तशा गोष्टी केव्हाच करु शकणार नव्हता. देवत्वाचा मोठेपणा, ह्या त्याच्याच भव्यता दिव्यता ह्यात सामावलेला होत्या. मात्र हेच ज्ञान सागर वाढू लागाले. प्रसरण पावू लागले आणि मानवाच्या क्षमतेच्या दिशा खूप दूर दूर जाऊ लागल्या. काळ आणि वेळ ह्यांच्यावर त्याने बऱ्याच प्रमाणात विजय संपादन केला. देवत्वाच्या वर्णनामधल्या जवळ जवळ अनेक बाबी ह्या मानवाने हस्तगत करण्याचा सपाटा चालू केला. ह्याचवेळी देवत्वामधली उर्जाशक्ती व विवेश गुणधर्मावरही मानवी प्रभूत्व दिसू लागले. त्या क्षणी देवत्वाच्या काही संकल्पना लोप पाऊ लागल्या. त्या देवत्वामधून निघून जात आहेत, असा त्याचा अर्थ नव्हे तर त्या सर्व मानवात देखील असल्याची जाणीव होऊ लागली. एक संकल्पना अद्यापी जागृत आहे आणि तो म्हणजे प्रत्येक देवात दैवी शक्तींचे अस्तीत्व असते. ही समज ह्या शक्तीमात्र मानवाने सांघीक पद्धतीने आत्मसात केल्या आहेत. म्हणूनच ते ज्ञान प्रचंड प्रमाणात वाढत असलेले जाणवते. ते कुणा एका व्यक्तीकडून नव्हे. प्रत्येक व्यक्ती ही जरी सक्षम असली तरी त्याची वैयक्तीक चेतना निरनिराळ्या प्रातांत धाव घेवून व्यक्त होत असलेल्या ज्ञानाला वृद्धींगत करते. हे कुणा एका मुळे मात्र नाही. ह्या सर्व सांघीक प्रयत्नात आणि तथाकथीत ज्ञानाच्या निरनिराळ्या दालनांत होत असलेली प्रगती जाणवते. अनेक महान व्यक्ती अनेक प्रातांत अनेक विषयांत जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रगत होत आहेत.
Leave a Reply