गुंतवणा-या परंपरा अन्
पंचांग मला दिसत नाही,
केला उपवास नाही तरी
देव माझा रुसत नाही …..
तिथी, वार-मुहुर्ताच्या
अडगळीत मी फसत नाही,
एक दिसाच्या भक्तीसाठी
देव माझा रुसत नाही …….
दलालांच्या जोखडात
कधीच ईश्वर बसत नाही,
दिला छेद परंपरेला तर
देव माझा रुसत नाही …….
तो असतो आमच्यात
आम्हालाच पटत नाही,
दुध तुपाच्या नैवद्यासाठी
देव माझा रुसत नाही …….
नसलो जरी नास्तिक मी
आस्तिक तेवढा दिसत नाही,
घेतलं नाही दर्शन तरी
देव माझा रुसत नाही …..
Leave a Reply