देवा तुझा मी सोनार
माझे काय बरे होणार
पैजण होऊ पाहे पायी
परंतु घुंगरु वाजलं नाही
मग कैसे रुनझुणणार
माझे काय बरें होणार?
मौतीक माळा होऊ पाही
परी मौतीक गुंफत नाही
कैसी मी रुळणार
माझे काय बरें होणार?
कमरपट्टा होऊ पाही
चाप बंधनी अडकत नाही
कैसी मी कसणार
देवा काय बरे होणार?
मुकूट मस्तकी होऊ पाही
मयूरपंख ना परी त्यावरती
कैसी मी ठसणार
देवा काय बरें होणार?
पायी जडावा होऊ पाही
शिवण गुंफूनी विणली जायी
चपकल मी बसणार
देवा पायी तुझ्या असणार
बनुनी जडावा रहीन पायी
घर्षण होऊनी फाटत जायी
पाय तुझे जपणार
देवा हेच बरें होणार
माझे हेच बरें होणार |
–चंदाराणी कोंडाळकर
Leave a Reply