नवीन लेखन...

देवाचे देणं हे देवाचे देणे

देवाचे देणे हे देवाचे देणं सोन्याच्या ताटाला मोत्याचे दाणं अशी एक कविता आहे. कविकल्पना अगदी रास्त आहे. एका दाण्याचे किती प्रमाणात दाणे आणि ते ही अनमोल अशा मोत्याच्या रुपात आणि माणसाची भूक भावणारे. तसेच लहानपणी राष्ट्रसेवादल मध्ये असताना एक गाण व त्यावर नाच शिकवला होता..
गुडघा गुडघा चिखलात पाय रोविले हो. पाय रोविले.
एकेक भाताचे रोप लावले हो लावले..
खर तर बाकीच्या धान्याची लागवड. पेरणी काढणी सगळे पाहिले आहे पण तांदळाचे नाही. मला वाटते की अक्षदा मग ते देवावर. औक्षवण करताना किंवा लग्नाच्या वेळी अक्षता म्हणून तांदूळच वापरतात. पण ते कुंकवाने रंगवले जातात. तांदूळच का असा विचार करत असताना लक्षात आले की भाताचे रोप दोन ठिकाणी रोवले जाते. जसे मुलीचे आयुष्य दोन ठिकाणी घडते. आणि तांदूळाला किड लागत नाही ते पोखरले जात नाही म्हणून असेल कदाचित. पण भाता शिवाय पोट भरत नाही भागत नाही म्हणून तर वाचवून संभाळून असे जाहिरातीत आहे..
तांदूळ अनेक नावाने. चवीने आणि अनेक प्रकारासाठी अनेक प्रकारचे आहेत. आता पुढील प्रमाणे भाताचे प्रकार..
शिळ्या भाताचा फोडणीचा भात केला जातो आणि तो सगळ्यांना खूप आवडतो. एखाद्या दिवशी संध्याकाळी जेवायला खिचडी. लोणचे. पापड. चिंचेचे. किंवा टोमॅटोचे सार केले जाते. पचायला हलके व करायला सोपे.
वांग्याचा. बटाट्याचा. तोडल्याचा. कोबीचा आणि मटार घालून केलेला मसाले भात. आणि हल्ली आणखीन एक पुलाव व व्हेज बिर्याणी हे दोन केले नाहीत व खाल्ले नाही. चित्रान्न. साखरभात. नारळी भात आणि दहिभात. आणि आता तर बरेच काही केले जाते. पण आजारी माणसाला पेज. उकड आणि भाजणी. मेतकूट. चकली अशा अनेक पदार्थात तांदूळ हवाच आहे. त्यामुळे अगदी लहानपणी भाताच्या तामल्यात जास्त पाणी घालून निखाऱ्यावर शिजवलेला गरगटा म्हणजे आसट भात तूप मेतकूट किंवा साधे वरण व दूध. साय. घालून परत आईच्या हाताने चुरुन चुरुन अगदीच मवू केलेला भात काऊ चिऊला बोलावून खाऊ घालतात आणि तेव्हा पासून भात आवडीचा पदार्थ असतो.मलाही असाच आसट भात आवडतो तो जिराराईस हा प्रकार अजिबात आवडत नाही अर्धवट शिजवलेला ना चव ना… भाताची खरी चव असते ती म्हणजे चुलीवर भात अर्धवट शिजवून झाला की निखाऱ्यावर वर ती भाताची गुंडी वर झाकण ठेवून त्यावर थोडा निखारा ठेवावा. आणि गरमागरम पहिल्या वाफेचा भात व साजूक तुपाची धार आणि आवडीचे मग ते मेतकूट किंवा साधे वरण लिंबू पिळून असलेला आसट गोड चवीचा भात…. अहाहा आणा समोर असे चित्र आणि बघा तोंडाला पाणी सुटलं कि नाही.
धार्मिक कार्यक्रमात. गावजेवणात. आणि एखाद्या विशिष्ट तिर्थ स्थानात फक्त भातच असतो. तिरुपतीला खिचडी आणि एक आठवण आहे ती म्हणजे लहान असताना तिथे गेल्यावर दहिभाताचे गोळे प्रसाद म्हणून मिळत होता. अगदी दोन्ही हातांच्या ओंजळीत भरुन आलं. उडीद डाळ. कडीपत्ता. वाळलेली लाल मिरची. हिंग घालून तुपाची फोडणी तोंड लावूनच खायचे आणि पोट भरुन जायचे. तसेच तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले श्री राघवेंद्र स्वामींच्या जागृत ठिकाणी रोजच मोफत पोटमर भात. वरण म्हणजे सांबारच. सार भात आणि शेवटी ताकभात. आणि मला आठवते की चाफळला पिठलं भात प्रसाद म्हणून दिला होता. पावसला पण खिचडीच होती. आणि असा प्रसाद म्हणून मिळतो तो भात कसा असतो हे अनुभव घेतला तरच कळतो..
आपली संस्कृती अशी आहे की जेवणाआधी ताटाभोवती पाणी फिरवून भाताची शितं तीन ठिकाणी ठेवून मगच जेवण करतात. जगा आणि जगू द्या प्राणिमात्रांना यासाठी. असा हा भात जगात आल्यापासून ते काकस्पर्श इथ पर्यंत भातच लागतो. हो ना?म्हणूनच म्हटले आहे की वाचवून. निवडून. सांभाळून आणि जमल्यास सजवून
— सौ कुमुद ढवळेकर.

1 Comment on देवाचे देणं हे देवाचे देणे

  1. Where can I get the full song “Gudgha Gudgha chikhalat paay rovile ho”?
    I will be gratefull if you can provide the link. I had this poem in my Marathi (Higher Level) text book og 6 th or 7 th standard in the year 1960.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..