नवीन लेखन...

आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहोचलेल्या देवकी पंडित

“देवकी पंडित”….मराठी संगीत जगतातलं, सध्याचं एक आदरणीय नाव…..सारेगमप मधला त्यांचा “पण” नेहमीच अचूक असयचा…..एखाद्या गाण्याबद्दलचं त्यांचा अभ्यास अगदी वाखडण्याजोगा असतो.त्यांचा जन्म ६ मार्च १९६५ रोजी झाला.
आभळमाया, वादळवाट, अवघाची संसार….आणि अश्या अनेक सीरियल्स ची टाइटल गाणी देवकीजींच्या आवाजात अगदी सुरेल आणि सुमधुर वाटतात. ह्रदयाच्या तारा छेडणाऱ्या आणि आज आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहोचलेल्या देवकी पंडित. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी व्यासपीठावर गाणे गाऊन श्रोत्यांच्या ह्रदयाच्या तारा छेडणाऱ्या आणि आज आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहोचलेल्या देवकी पंडित. सुरांच्या काटेकोरपणाबद्दलचा त्यांचा आग्रह, परखडपणा हे त्यांचे वैशिष्टय़ असूनही सामान्य रसिकांच्या मनात स्थान मिळविणारे हे नाव. शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजवत असतानाच हिंदी-मराठी चित्रपटांसाठी पाश्र्वगायन करणाऱ्या, मालिकांच्या शीर्षकगीते करणाऱ्या देवकी पंडित यांनी सुरुवातीला आपली आई उषा पंडित यांच्याकडे गाणे शिकल्यानंतर त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे काही काळ संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर किशोरी आमोणकर, व जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शिकायची संधी त्यांना मिळाली. गुरूंकडून सतत शिकत रहावे या वृत्तीने त्या पुढेहा बबनराव हळदणकर, डॉ अरुण द्रविड यांची मार्गदर्शन घेत राहिल्या. पंडित वसंतराव कुलकर्णीकडे शिकत असताना ते पूर्वीच्या गायकांची उदाहरणे द्यायचे. पूर्वी गायक कसे १२-१२ तास रियाज करत असत हे सांगायचे. एकदा ते दोन महिन्यांकरता बाहेरगावी जात असताना रियाज व्यवस्थित चालू ठेवण्यास सांगून गेले. तेव्हा देवकी पंडित यांनी ते ते इतके मनावर घेतले, की भरपूर रियाज करायचा एवढा एकच विचार मनात ठेवून त्या गात राहिल्या. दोन महिने सतत गायल्यामुळे त्यांचा आवाज बंदच झाला. त्यानंतर त्या जवळजवळ तीन वर्षे गाऊच शकल्या नाहीत. त्या दोन-तीन वर्षांच्या काळात देवकी पंडित तंबोरा लावून बसायच्या आणि गाता येत नसल्याने केवळ सूर ऐकत राहायच्या. त्या काळात त्यांनी सगळ्यांची खूप गाणी ऐकली. तंबोरा योग्य रीतीने कसा लावला पाहिजे, खर्ज, पंचम कसा लावायचा या गोष्टी पुन्हा पुन्हा करून त्यांनी आत्मसात केले. याच काळात देवकी पंडित हार्मोनियम व तबला शिकल्या. गेल्या तीन दशकांपासून देवकी पंडित संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. वेगवेगळ्या स्वरूपांत, वेगवेगळ्या प्रयोगांमधून त्यांची स्वरप्रतिभा रसिकांसमोर येत आहे. तानसेन, मल्हार, सवाई गंधर्व यांसारख्या प्रख्यात संगीत महोत्सवांमधून त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजल्या. तसेच ‘अस्तित्व’, ‘कभी हां कभी ना’, ‘मान्सून वेडिंग’, ‘वॉटर’, ‘साज’ अशा हिंदी चित्रपटांसाठी केलेल्या पाश्र्वगायनातून त्यांनी वेगळा ठसा उमटवला. ‘सावली’, ‘अर्धागी’ अशा मराठी चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाले. ‘आभाळमाया’, ‘हसरतें’, ‘रामायण’ या गाजलेल्या मालिकांच्या शीर्षकगीतांमधून देवकी पंडित या घराघरांत पोहचल्या. ‘रिअॅलिटी शो’च्या परीक्षक म्हणून काम करताना देवकी पंडित यांच्या मधील सुरांच्या अचूकतेबाबत आग्रही असणारी गायिका सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

देवकी पंडित यांनी गायलेली काही गाणी
जाळीमधी झोंबतोया गारवा
तुम्ही जाऊ नका हो रामा
वादळे उठतात किनारे
सप्तसुरांनो लयशब्दांनो जगेन
सूर्यनारायणा नित्‌ नेमाने उगवा
माझी उदास गीते तू ऐकतोस

https://www.youtube.com/shared?ci=e-aIoBrIpJY

https://www.youtube.com/shared?ci=JB8x9xCvQmc

https://www.youtube.com/shared?ci=0xW4b9zNlc4

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..