काय म्हणू ग तुजला देवकी भाग्यवान की अभागी
ईश्वर तुझीया उदरी येवूनी सुख न लाभले तुजलागी //
जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला
तु तर असता जननी प्रभूची तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला //
राज वैभवी वरात निघता कारागृही तुज घेवून गेले
अवताराची चाहूल असूनी दुःखी सारे जीवन गेले //
कंसाने तव मुले मारीली निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी
तु गिळून घेशी दुःखे सारी आगमन प्रभूचे होण्यासाठी //
ईश्वर येता तव उदरी भाग्यवान तू ठरलीस
जनकल्याणा त्यागूनी त्याला सर्व श्रेष्ठपदी गेलीस //
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply