नवीन लेखन...

‘ध’ चा ‘मा’

कोण आहे रे तिकडे,महाराजांनी आवाज दिला.सेवक दौडतच आला.

महाराज आज्ञा असावी.

अरे, प्रधानांना ताबडतोब इकडे उचलून आण. महाराज गरजले.
उचलून ? मी नाही समजलो महाराज, सेवक भीत भीत म्हणाला.
गधड्या मला म्हणायचं होतं ताबडतोब त्यांना बोलावून आण. जसे असतील तसे.
टॉवेलात असतील तरी चालतील कां तुम्हांस..

गधड्या तू मलाच प्रश्न विचारतोस. पुढचा प्रश्न तुझ्या तोंडी आला तर तुला उचलून फेकून देईन. हिमालयात जावून पडशील. महाराज गरजले. महाराजांचा रागरंग बघून सेवक पार्श्वभागाला पाय लावून पळाला.
थोड्याच वेळात प्रधानजी महाराजांसमोर पळत हजर झाले. कुर्निसात-सलाम झाल्यावर प्रधानजींना महाराजांनी फैलावर घेतले.
सध्या घेत असलेला ब्रँड बदला प्रधानजी.तो भेसळ युक्त असल्याची आमची दाट शंका आहे.
महाराज आपल्या राज्यात भेसळ शक्यच नाही. प्रधानजी दणक्यात म्हणाले.

प्रधानजी,आम्ही आपल्या राज्यातली म्हणालो नाही.तुम्हास कंट्री चालत नाही हे आम्हास ठाऊक नाही, असे तुम्हास वाटते काय?
आम्हास तसे वाटून कसे चालेल. आम्हास 60 व्या वर्षी निवृत्त व्हायचे नाही..महाराज.
मग आम्ही म्हणालो तसं तुमची ब्रँड बदलाच. भेसळीची ब्रँड पोटात जात असल्याने तुमच्या डोक्याचा बँड वाजला आहे,पुरता.महाराज गरजले.

मी समजलो नाही महाराज.प्रधानजी चरचर कापत कसेबसे बोलले.काहीतरी मोठी गफलत महाराजांनी पकडल्याचे त्यांच्या लक्षात आले. 60 व्या वर्षी निवृत्त होण्याच्या स्वप्नाचे फुस्स झाल्याचे दृष्य त्यांच्या डोळ्यासमोर तरळले. आलिया  भोगासी असावे सादर या म्हणीनुसार ते खाली मान घालून मारुती स्त्रोत म्हणू लागले. दोन ओळीच्या पुढे ते सरकेना. नकली ब्रँडने आपल्या मेंदुचा बँड वाजवल्याचे त्यांची खात्रीही पटली.

महाराजांनी प्रधानजींच्या हाती एक यादी सोपवली आणि गरजले वाचा जोराने..
प्रधानजी वाचू लागले.. अमूक तमूक यांचाही या मरण यादित समावेश करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
यादी वाचून होताच महाराज गरजले.

प्रधानजी काही डोक्यात प्रकाश पडला का?

महाराज हे असं झालंच कसं? आपल्या राज्यात सरपन यादी तयार केली जाते. सुरण यादी तयार केली जाते. मागे एकदा महाराणी साहेबांनी सुग्रण यादी केली केली होती. आपला सामान्य प्रशासन विभाग सणवार यादी तयार करतो. राजकन्यासाहेबांनी सखीयादीचे आदेश दिल्याचे मला आठवतात. आमच्या सौभाग्यवतींनी एकदाच साबणयादी दिल्याचे मला अजुनही स्मरतं.पण मरण यादीचे मी पहिल्यांदाच ऐकतो आहे महाराज.. हा नक्किच आपल्या शत्रुचा डाव असला पाहिजे.
खामोश प्रधानजी,आपला शत्रू कोण आहे हे तरी तुम्हास ठाऊक आहे का?
महाराज आपल्याला कुणीही शत्रू नाही हेच मी विसरलो होतो.क्षमा असावी ..
प्रधानजी तुम्ही वयाच्या मानाने फार लवकर म्हातारे झालात हो.भेसळ ब्रँड रिचवल्यावर असेच व्हायचे.
पण मी 60 व्या वर्षीपर्यंत  कामकरु शकेन हो.

प्रधानजी,तुम्ही 600वर्षं काम करा,पण या मरण यादीचं काय? कुठून आली ही यादी आणि या मरण यादित समाविष्ट करण्याची कुणाची शिफारस तुम्ही माझ्याकडे करताहात?ध चा मा झाला की काय होतं, हे तुम्हाला माहीत नसून कसे चालेल. पुण्याचे ना तुम्ही. तुमचे चुलते शनिवारवाड्याजवळच राहायचे,तरीही तुम्हाला ठाऊक नाही..तुमचा भूगोल कच्चा होताच आता इतिहासाचेही पानिपत करुन टाकले तुम्ही.
महाराज मी समजलो नाही..
प्रधानजी, ही  मरणयादी  आली  कुठून..
महाराज स चे म झाल्याचे दिसते हो ..चुकून झाले असावे..
प्रधानजी ही चूक अक्षम्य आहे. त्यामुळे तुम्हीच शिफारस केल्यानुसार तुमचेच पहिले नाव या मरण यादित पहिल्या नंबरवर टाकतो.
म्हणजे हो महाराज
यू ऑर डिसमिस..महाराज गरजले.दणदण पावलं टाकत अंत:पुराकडे निघून गेले..महाराज मला वाचवा हे सुध्दा म्हणण्याची त्यांनी प्रधानजींना संधी दिली नाही…

— सुरेश वांदिले  

Avatar
About सुरेश वांदिले 11 Articles
श्री. सुरेश वांदिले हे महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागात संचालकपदावर आहेत. महाराष्ट्र शासनाच्या “लोकराज्य” या मासिकाचे ते संपादक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..