नवीन लेखन...

ढासळलेले बुरूज, पडके वाडे अन् पांगलेली वस्ती

स्वातंत्र्यानंतर गावखेडी बदलत गेली. गुलामगिरी संपली. स्वराज्य आणि सुराज्य बहरू लागले.पाश्‍चात्य गेले. जुलमी राजवट संपली.इंग्रज गेले . भारतात सुरू झाला तो स्वातंत्र्याचा उपभोग. देशाने लोकशाही स्वीकारली. गुलामीत वास्तव्य केलेल्या खेड्यात नवी पहाट उगवली. स्वातंत्र्स संग्रामासाठी केलेला त्याग पाठीशी होता. देश बदलतो आहे. प्रजासत्ताक प्रशासन प्रणाली, लोकशाही जीवनव्यवस्थेचा स्वीकार झाला. देशात शहरे बदलत गेली तसा खेड्यातही बदल होतो आहे. मातीच्या भिंतीला सिमेंट चिटकून बसले. घरावर छपराऐवजी सिमेंटचे छत आले. शेतीत अवजारांची संख्या वाढली. पीकांवरील औषधी वाढली. नवीन वाण आले. रासायनिक खताचा वापर होऊ लागला. कलमी झाडं वाढू लागली. एकाऐवजी दोन तीन हंगामी पिके घेता येवू लागली. ठिबक, तुषारांमुळे मुळाशी पाणी जाऊ लागले. घराला रेडीमेड तोरणं येवू लागली.वाहने वाढली.सायकल जाऊन मोटारसायकल आली. त्याही एकेका घरात दोन- तीन. रेडिओच्या ऐवजी रंगीत दूरदर्शन संच आले. त्यातही अत्याधुनिक पातळ,चपटे आकाराचे संच अवतरले. हाती मोबाईल आले. अगोदर साधे होते. तेअँन्ड्रॉईड झाले.टच स्क्रीनवर बोटे फिरू लागली. कुठे कुठे डांबरी पक्के रस्ते आले. बदल होत गेला.सुख-वस्तू सहज मिळू लागल्या. कामे झटपट होऊ लागली.

ही व्याप्ती वरचेवर वाढतच जात आहे. बैलांची संख्या कमी आणि ट्रॅक्टरची आणि अवजारांची संख्या वाढत चालली. जेसीबीचे एक खोरे दहा माणसांच काम करू लागले.लग्नकार्यासाठी मंगल कार्यालय उपलब्ध झाले. लोकं मनसोक्त खर्च करू लागली. आरोग्य सुविधा वाढल्या. अत्याधुनिक यंत्रणा आली. लिंगपरीक्षण होऊ लागले. स्त्री – पुरुष भेदाची जाणीव होऊ लागली. शिक्षण प्रगत होत आहे. मराठी की इंग्रजी याचे स्वातंत्र्य मिळू लागले.

पैसा दिला की सुविधा मिळू लागल्या. निर्जीव मशीन पैसा मोजू लागले.खात्रीशीर देऊ लागले.घेऊ लागले.पासबुक हिशोब ठेऊ लागले.कॅशलेश की अभी बात चल रही है. पीकविम्यासाठी बँकासमोर गर्दी आहे. संगणक नावाचा पडदा अवतरला.यंत्र अवतरले.सॉप्टवेअर, हार्डवेअर संकल्पना झपाट्याने पसरली. व्हाऊचर संस्कृती आली. डिजीटल युग अवतरले. क्षणात देश- परदेशात समोरासमोर पाहत संवाद होऊ लागला. छपाईचे तंत्र बदलले. बॅनर्स युध्द उभे राहिले. रेडिमेड कपडे पाहिजे तसे मिळू लागले. काळ बदलतो तसे जग बदलते.

अशा परिस्थितीत ग्रामसंस्कृतीची दिशा तपासायला हवी.गावगाडा होता. पाटील, पटवारी, परंपरा, रूढी यांची ठेवण कुठे आहे? प्रस्थापितांचा तो दरारा. ती हुकूमशाही आज नेस्तनाबूत झाली आहे.जी थोडीफार आहे ती कालोघात कमी होईल. बारा बलुतेदारी संपण्याकडे चालली आहे.आसामी हा प्रकार इतिहास जमा होतोय.रोखीचे व्यवहार वाढताहेत. जुनी छप्पर घरे कमी झाली. ज्या घरी शिक्षणाचा प्रसार झाला.ती घरं पुढे गेली.ज्यांना जगण्याची किल्ली मिळाली त्यांना कोठार मिळाले. आपोआप माणसं गतीमान झाली.चाक फिरावेत तशी गरागरा फिरताहेत. जगण्याचा नवा संघर्ष उभा आहे. नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊ लागली. जुनी बुरूज संस्कृती ढासळली . नवीन सिमेंटची वन- टू बीएचके प्रणाली उभी राहतेय. मायेच्या मातीचा पापुद्रा कठीण सिमेंटच्या कवचात रूपांतरीत होतो आहे. चिखलमातीच्या कुडाच्या भिंती माणसांना उन्हाळय़ात गारवा, पावसाळय़ात निवारा आणि हिवाळय़ात ऊब देत होती.ती सिमेंटने मिळत नाही. तात्पर्य हे की गावामध्ये जी आपुलकी प्रेम जिव्हाळा होता तो व्यवहारी जगताकडे झुकू लागला आहे. परिणामस्वरूप नातेसंबंध मैत्री या बाबींची व्याख्या बदलू पाहते आहे. गाव ओस पडत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे युवावर्ग शहरांकडे स्थलांतरीत होतो आहे. तिथेही नित्य नवनवीन समस्या उभ्या राहत आहेत. उर्वरीत शेतीवर अवलंबून असणारा वर्ग शेतीच्या सोयीने रानोमाळ पांगला. वस्ती बांधुन निवास करू लागला आहे. शेताच्या बाजूला, रस्त्याच्या कडेला , पाण्याच्या सोयीनुसार रहीवास करू लागला आहे. वस्ती वाढते आहे. देवदेवता स्थापण्याची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे. हा नवा बदल आहे. जिथे पूर्वी जायला घाबरत तिथे वस्ती झाली. गुरांढोरांची सोय लागते. पाणी, वैरणकाडी, चारा मिळतो. कुठे वीटभट्टी , गुर्‍हाळं , रस्त्याची कामे, ऊसतोड, खदाण, खाणीचा दगड काढण्याच्या कारणामुळेही वस्ती होते. जगण्याचा नवा संघर्ष उभा राहतोय.

गावातील जुने वाडे, खांडादांडाची म्हणजे माळवदाची. जिथे चारपाच भावंडाच कुटुंब एकत्र नांदायच.तिथे एक भाऊ आपल्या कुटुंबासह मोठय़ा शहरात . तर दुसरा दुसरीक.डेएखादा गावीच अशी अवस्था. विभक्त कुटुंब व्यवस्था. तशीच अवस्था पूर्वीच्या एकोप्याची झाली आहे. लोकशाही आली. निवडणूक आली.पक्ष आला. आरक्षण आले.शह-काटशह आलाच. मतदान आले. पैसावाटप आले.जातीभेद आला.मतभेद आले.मनभेद होऊ लागले . जवळचे नातेसंबंध तुटू लागला. दुरावा निर्माण होऊ लागला. सामाजिक ध्रुवीकरण होऊ लागले.एकसंघपणात विसंगती निर्माण होऊ पाहते आहे. एकल संक्रमणाचाच हा काळ आहे.अजुनही काहींना अन्न , वस्त्र , निवारा नाही. तो व्यवस्थेने द्यावा.

पडकी वाडे, ढासळलेले बुरूज आणि पांगलेली वस्ती जरी असली तरी जगरहाटी चालत असते .थोडा माणूसकीचा ओलावा शिल्ल्लक राहावा.तो युवावर्ग जोपासतो आहे. हे बरे आहे.नवी पिढी प्रगल्भ विचाराची आहे.हा युवक जुन्याचा आदर करतो तसे नव्याचा स्वीकार करतो आहे.तो ओलावा पुरेसा आहे. भविष्यासाठी आशादायी आहे..
पुण्यनगरी

विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
मो.9421442995

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..