शतकानुशतके चालत आलेल्या वर्णव्यवस्थेला बाबासाहेबांनी मूठमाती दिली तो दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ ला धर्मातर करून लाखो शोषितांच्या जीवनात बदल घडवून आणला. दीक्षाभूमीवरील या धम्मदीक्षा सोहळ्याने लाखो अनुयायांच्या मनात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले. त्यामुळेच या दिवशी दरवर्षी दीक्षाभूमी निळ्या पाखरांनी सजू लागते.
दीक्षाभूमीवर येणाऱ्यांमध्ये दरवर्षी ३० टक्के नवीन लोकांचा समावेश असतो. यामध्ये बहुतांश तरुणाई असते. ही तरुणाई बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये पसरवण्यासाठी येथून प्रेरणा घेत असते.
त्या दिवसाचे स्मरण व बाबासाहेबांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होण्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी दरवर्षी दीक्षाभूमीवर येतात. मात्र, करोनामुळे यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रमच रद्द झाला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply