धर्मवीर भारतीं यांचे आडनाव वर्मा. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९२६ रोजी अलाहाबाद येथे झाला.१९४७ मध्ये हिंदी साहित्याची पदवी संपादन केलेले भारती विद्यार्थीदशेपासूनच स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्योत्तर काळात काही काळ त्यांनी हिंदी साहित्याचे अध्यापन केले.नंतर ‘अभ्युदय’ या हिंदी साप्ताहिकेतून आपल्या पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. अलाहाबाद विद्यापीठात काही काळ हिंदीचे अध्यापन करून १९६० मध्ये टाईम्स समूहाच्या ‘धर्मयुद्ध’ मध्ये त्यांनी प्रवेश केला. १९८७ पर्यंत ‘धर्मयुग’चे ते संपादक होते. डॉ. धर्मवीर भारतींना आधुनिक हिंदी साहित्याचे अध्वर्यू मानले जाते. त्यांनी ऑस्कर वाईल्डच्या कथांचे हिंदी अनुवादही केले. त्यांचा ‘कनुप्रिया’ हा काव्यसंग्रह हिंदी साहित्यातील एक नवा टप्पा मानला जातो.
‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ या त्यांच्या साहित्यकृतींवर चित्रपट झाले. सुमारे ५० वर्षे हिंदी साहित्य आणि पत्रकारिता ही क्षेत्रे गाजविणा-या धर्मवीर भारतींची ‘अंधा युग’ ही कलाकृती अजरामर ठरली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना अनेक साहित्य पुरस्कार दिले. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला. धर्मवीर भारती यांचे ४ सप्टेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ चित्रपट
https://youtu.be/JS00ybwPZtw
Leave a Reply