‘आता हे हिंदुराज्य जाले’ या ओळी आहेत शंभूराजांनी बसवलेल्या शिलालेखावर.
चाफळपासून ते थेट तिरुपती देवस्थानपर्यंत जी जी वर्षासने छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून दिली आहेत; ती तशीच चालू रहावीत ही आज्ञा आहे शंभूराजांची.
सज्जनगडावर समर्थांची समाधी बांधली ती शंभूराजांनी.
‘आहे तितुके जतन करावें । पुढे आणखी मेळवावे ।
महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥‘
हा समर्थ संदेश अखेरच्या श्वासापर्यंत पाळला तो शंभूराजांनी.
‘आम्ही हिंदू सांप्रत सत्वशून्य झालो आहोत’ अशी चीड व्यक्त करतानाच वेद- स्मृती यांनी नेमून दिलेली क्षत्रिय वर्णनिहाय कर्मे करणे आम्हाला औरंगजेबसारख्या यवनाधमामुळे शक्य होत नाही असे शंभूराजे; रामसिंगला लिहितात.
हिंदू मंदिरे पाडून जिथे अन्यपंथीय प्रार्थनास्थळे उभारली आहेत; ती पाडून पुन्हा मंदिरे उभारण्याचे आदेश देतात शंभूराजे.
गोव्यात पोर्तुगीज पाद्र्यांनी चालवलेल्या धर्मांतरणाच्या अनन्वित अत्याचारांना ‘जशास तसे उत्तर’ देतात ते शंभूराजे.
‘धर्माशिवाय जगणे म्हणजे साक्षात मरण आहे’ असं बुधभूषण या ग्रंथात शंभूराजे लिहितात.
‘माझ्या मुलुखातून कोणीही माणूस धर्मांतर करवून बाटवता येणार नाही’ असे कलम शंभूराजे तहात घालतात.
शिवराय- शंभूराजे यांना ‘सेक्युलर’ ठरवणाऱ्या निधर्मीवादी आणि हिंदुद्रोही बांडगुळांनो; संपूर्ण शंभूचरित्र तपासून पहा. असे खंडीभर पुरावे सापडतील……
शंभूराजे म्हणजे साक्षात रुद्र आहेत. ज्यांच्या तृतीय नेत्राच्या तेजाने अवघे हिंदुत्व उजळून निघाले.
‘धर्मवीर’ ही उपाधी कोणाला शोभून दिसत असेल तर ती शंभूराजांनाच.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय!!
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(व्याख्याते: शंभूराजांची राजनीती; संपर्क: 0251-2863835)
Leave a Reply