अवघड, अज्ञात रस्त्यावरी
तुडवीली मी, अनेक वळणे
लक्ष एकची ध्येय सत्कार्याचे
चालतो, नित्य मी बेधुंदपणे ।।१।।
खंबीर! धीरोदात्त ही पाऊले
अविश्रांत चालली निमुटपणे
गती डौलदार, जणू राजहंसी
चालतो मीही रस्ता सहजपणे ।।२।।
जन्म, मरण! प्रवास जीवाचा
कधीच नाही चुकला कुणाला
भोग! प्रारब्धाचे भोगावे सारे
जगताजगता सहज निमुटपणे ।।३।।
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.९८.
२ – ८ – २०२१.
Leave a Reply