नवीन लेखन...

धीरूभाई हिराचंद अंबानी

धीरूभाई हिराचंद अंबानींचा जन्म २८ डिसेंबर १९३३ रोजी झाला. धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी धीरुभाई हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. धीरुभाई यांचे वडील हिराचंद हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शिक्षण अर्धात सोडल्यानंतर धीरुभाई मुंबईत आले. उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर फळे विकण्याचे काम केले. दुकानांमध्ये काम केले. त्यानंतर ते यमन येथे गेले. तिथे त्यांना एका रिफायनरीत मोलमजुरी केली. पेट्रोल पंपावर इंधन भरण्याचे काम केले.

यमनहून मायदेशी परतल्यावर १९५९ साली धीरूभाई यांनी मशीदबंदर मुंबई येथे नात्याने दूरचे मामा असलेल्या त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते.

मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह भुलेश्वर येथे जिच्यात सुमारे ५०० कुटुंबे रहात होती अशा एका चाळीत राहू लागले. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. शिवाय लहान भाऊ नटुभाई यांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तेही कामास मदत करू लागले.

१९६६ साली धीरूभाई अंबाणी यांनी अमदावाद जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरूवात केली. हे पाऊल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. १९७१ साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड, झांबिया, युगांडा इ. देशांमध्ये निर्यात करण्यास सुरूवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायऱ्या चधू लागले. १९७५ साली जागतिक बँकेने ‘विकसनशील देशांमधील सर्वोत्कृष्ट प्रकल्प’ म्हणून नरोडाच्या प्रकल्पाची निवड केली.

१९७७ साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नासाठी सुमारे ५८,००० लोकांनी आपले पैसे गुंतविले. १९७८ साली धीरूभाई कापड व्यवसायत पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्रीस सुरूवात केली. साधारणपणे दिवसाला एक या सरासरीने धीरूभाईंनी १९७७ ते १९८० या काळात देशभरात विमलची शोरूम थाटली.

१९८१ साली मुकेश अंबानी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण संपवून भारतात परतले तर १९८३ साली अनिल अंबानी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून भारतात आले.

१९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५,००० कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली तसेच २००० मध्ये २५,००० कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. धीरूभाईंचा दबदबा सर्वत्र जाणवू लागला. टाईम्स ऑफ इंडियाने शतकातील श्रेष्ठ चार व्यक्तींपैकी धीरूभाई एक आहेत असे गौरवोद्गार काढले, तर फिक्कीने २० व्या शतकातील साहसी पुरूष म्हणून धीरूभाईंचा गौरव केला. १९७७ मध्ये साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जावून २००७ साली अंबानी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर होती. धीरूभाई यांनी बिझनेस सुरु केला तेव्हा त्यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता नव्हती.

तसेच त्यांच्या कुठलाही बॅंक बॅलेन्स नव्हता. एकदा धिरुभाईंना एका मुलाखतीत ‘तुमच्या यशाचे रहस्य काय आहे’ असे विचारले. तेव्हा त्यांनी ते उत्तम सेल्समन असुन त्यांच्या यशाचे श्रेय त्यांना एडमधील दहा वर्षांच्या नोकरीत सेल्समन म्हणुन जो अनुभव मिळाला त्याला दिले. त्यांच्या मते सेल्समनचे मुख्य कौशल्य आपल्या मालाचे किंवा योजनेचे महत्व व फायदे प्रभावीपणे ग्राहकांना समजाऊन सांगणे.

थोडक्यात मार्केटिंगच्या अनुभवावर माणुस, तो सुध्धा ग्रामीण भागातुन आलेला व कमी शीकलेला, काय चमत्कार करु शकतो हे त्यांनी आपल्या उदाहरणाने दाखवुन देऊन भारताच्या कार्पोरेट सेक्टरमधे आपले नांव सुवर्णाअक्षरांनी लिहुन ठेवले आहे. धीरूभाई अंबानी यांचे निधन ६ जुलै २००२ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..