नवीन लेखन...

ध्यानधारणा

कथा रमण महर्षिच्या आश्रमातली आहे. त्यांच्या एका शिष्याने उपासना संपल्यावर एकदा त्यांना विचारले “गुरुजी, तुम्ही आम्हाला आमचे मन नियंत्रणात ठेवायला सांगता. त्यासाठी ध्यानधारणा सांगता. त्याचे कारण काय आहे? ”

रमण महर्षी म्हणाले “आपले मन आपल्या ताब्यात असेल तर आयुष्य समाधानाचे होते. म्हणून मी तुम्हाला ध्यानधारणा करायला सांगतो.”

ते दोघे आश्रमात ही चर्चा करत फिरत असताना त्यांना एका झाडाखाली एक खार व तिची छोटी छोटी पिल्ले दिसली. रमण महर्षिनी त्या खारीला संरक्षण द्यायचे ठरविले. ती खार व तिची पिल्ले आश्रमाचीच होऊन गेली.

दुदैवाने एक दिवस आश्रमात ध्यानधारणा चालू असताना एक मांजर खारीपाशी गेली आणि तिने तिला खाऊन टाकले. ते पाहून सगळेच हळहळले. रमण महर्षिंनी तिच्या पिल्लांना मायेने उचलून एका पिंजऱ्यात ठेवले. तो पिंजरा उपासनेच्या कक्षात ठेवला ज्यायोगे त्या पिल्लांवर उपासनेच्या दरम्यानही लक्ष ठेवता येईल.

पुन्हा एकदा असे घडले की ध्यानधारणा चालू असताना एक मांजर त्या पिंजऱ्यापाशी आली. तिला बघून पिल्ले एवढी घाबरली की ती पिंजऱ्यातून बाहेर पडून इतस्तत: धावू लागली. रमण महर्षिचे तिकडे लक्ष गेले. त्यांनी पटकन पिल्लांना गोळा केले आणि पुन्हा पिंजऱ्यात नेऊन ठेवले. आता त्यांनी पिंजऱ्याचा दरवाजा बंद केला.

रमण महर्षी शिष्यांना म्हणाले “या पिल्लांना स्वतःचे हित कळत नाही. म्हणून मांजर आल्यावर ती उलटी पिंजऱ्याबाहेर पडली. आपल्याला माहित आहे की त्यांना त्यांच्या सुरक्षिततेची जाणीव होईपर्यंत आपल्याला त्यांना सांभाळायला हवे.

आपल्या मनाचेही असेच असते. जोपर्यंत आपण त्याला नियंत्रित ठेवत नाही, मन आपल्या ताब्यात रहात नाही. मग वेगवेगळ्या प्रकारचे विकार आपल्याला त्रास देऊ लागतात. काही तर आपल्याला गिळंकृत करायला बघतात. त्यामुळे आपल्याला आपले मन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. त्या निरागस खारीच्या पिल्लांप्रमाणे आपणही आपल्या मनाला सुरक्षित ठेवले पाहिजे. तरच आपण मानसिक दृष्ट्या संतुलित होतो. अन्यथा आपले मन सैरभैर भटकत रहाते. एकदा मनाला त्याच्या सुरक्षिततेची जाणीव झाली की वेगळा अभ्यास करण्याची गरज रहात नाही. आपले मन आपोआप एकाग्र होऊ लागते. ही पिल्ले ही समजदार झाल्यावर स्वतःची काळजी घेऊ लागतील.

मन ताब्यात आणण्यासाठी ध्यानधारणा शिकविली जाते. त्यातून आपण आपले मन एकाग्र करुन शांत करायचा, त्याला विकार विरहित करायचा प्रयत्न करतो. म्हणून ध्यानधारणा महत्वाची आहे. एकदा आपले मन आपल्या ताब्यात आले की जीवनातल्या अनेक गोष्टी आपल्याला महत्वाच्या वाटेनाशा होतात.”

रमण महर्षिंनी प्रबोधन करण्याऐवजी खारीच्या पिल्लांची सुरक्षितता सांभाळून शिष्यांसमोर जीवनातला एक जिवंत अनुभव ठेवला. मन ताब्यात ठेवणे आणि ध्यानधारणा करणे त्यांनी इतके सोपे करुन टाकले. त्या दिवसानंतर ध्यानधारणेच्यावेळी शिष्यांना एकाग्रता साधू लागली.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..