नवीन लेखन...

डायल २६११, देशाचे सुरक्षा कवच !

Dial 2611

जगात सुरक्षा आणि संरक्षणासाठी विविध उपाय योजना तयार केल्या व राबवल्या जातात. कोणताही प्रगत देश असो आता पर्यंत यातील कोणतीही यंत्रणा वा कार्यप्रणाली हा ठोस किंवा निश्चित उपाय होऊ शकला नाही. अमेरिका, चीन, ईस्रायल, जपान सारखे देश आजही पर्यायी उपायासाठी चाचपडत आहेत. यावर पुण्यातील शास्त्रज्ञ, टेलीकॉम्युनिकेशन इंजिनिअर तथा माजी तंत्रज्ञान सल्लागार भारत सरकार श्री. दिनकर बोर्डे यांनी तयार केलेल्या “डायल २६११” या परियोजनेमुळे जगाला एक कायमस्वरुपी नागरी, सामाजिक, विभागीय, अंतर्गत, सीमावर्ती, तटवर्ती, अवकाशीय आणि देशीय सुरक्षा आणि संरक्षणासाठीचा ठोस व परिणामकारक उपाय मिळणार आहे.”डायल २६११”, हे मनुष्यबळ, अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान व उपलब्ध सामर्थ्य यांचे एक परफ़ेक्ट समीकरण असून प्रत्येकाच्या जीवनात लवकरच “डायल २६११” ही संकटकाळी तत्परतेने मदतीला धाऊन येणारी “शक्ती” ठरणार आहे. आगामी काळात येणारी संकटे आणि दुर्घटना टाळण्याची तसेच संकटकाळी घ्यावयाच्या योग्य त्या खबरदारीची जाणीव देखील “डायल २६११” आपल्याला करुन देणार आहे.

काय आहे ही “डायल २६११” परियोजना?

“डायल २६११” ही २६११ (सव्वीस अकरा) या एकाच क्रमांकाची केन्द्रीय हेल्प लाईन दूरध्वनी परियोजना असून केवळ देशाच्या सुरक्षा आणि संरक्षणा पुरती मर्यादित न राहाता तातडीची नागरी सेवा सुरक्षा व आपातकालीन व्यवस्थापन तसेच शांतता प्रस्थापित करणे यासाठी महत्वाची ठरणार आहे. “डायल २६११” या परियोजनेस तांत्रिक भाषेत ऑफ़िशियल नॅशनल ईमरजन्सी टेलीफ़ोन नंबर असे म्हणतात. संपुर्ण भारतातून २६११ (सव्वीस अकरा) या टोल फ़्री दूरध्वनी क्रमांकावर लॅंन्डलाईन, कॉईन बॉक्स, मोबाईल, इंटरनेट, इंटरनेट फ़ोन (यालाच व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल, व्हिओआयपी, असे म्हणतात.) किंवा टेलिमॅटिक्स द्वारे आपण आहात त्या ठिकाणा वरुन आपण घरी, प्रवासात, कामाच्या ठिकाणी, अनोळखी वा दुर्गम भागात असलात तरी संपर्क केल्यास विदाउट एंगेज आणि विदआउट ऍटोमेटेड रेसपॉन्स तडक जनसुरक्षा सेवा केंद्रातील प्रशिक्षित कर्मचारी आपला कॉल घेत आपल्याशी घटना, परिस्थिती, परिसर विषयी जाणून घेतात, सोबतच डायल २६११ ची अत्याधुनिक यंत्रणा आपले आस्तित्व मॉनिटर करत असते. तातडीने तेथील घटना, परिस्थिती व परिसर नुसार लगतची स्थानिक पोलिस (१००), अग्निशामन (१०१), वैद्यकिय सेवा (१०२), महिला, बाल तथा वरिष्ठ नागरिक अत्याचार प्रतिबंध (१०३) तसेच… (१०८).. (११४) ई. कायदा सुव्यवस्था सेवा योग्य त्या समन्वय धोरणा नुसार तातडीने आपण आहात त्या ठिकाणी त्वरेने उपलब्ध होईल. वेळ प्रसंगी डायल २६११ यंत्रणेत नोंद केलेल्या स्थानिक सामाजिक संस्थांना पण बचाव कार्यामधे समवून घेतले जाईल. गरज पडल्यास मिलिटरी, एनएसजी, बीएसएफ़, कोस्टल गार्ड यासारख्या सेवा देखील त्या ठिकाणी वेळेत पाठवून आपले मिशन यशस्वी करतील. सर्व तातडीचे नियोजन व आयोजन यासाठी “डायल २६११” परियोजना समर्थ असल्यामुळे विना संभ्रम मदत कार्य पुर्णत्वास नेता येईल.

संदिग्ध वस्तू वा हालचालींची माहीती २६११ वर कळवल्यास संभाव्य हानी टाळणे शक्य़ होईल. जीपीएस, जीआयएस, एलबीएस, सॅटेलाईट, नेट, मोबाईल, आयटी ई. सारख्या अत्याधुनिक तंत्रामुळे संपर्क करणा~याचे स्थान व व्यक्तित्व त्वरित समजणार असून मदत पोहचवण्यासाठी याचा फ़ायदा होणार आहे. याशिवाय या अद्दयावत हेल्पलाईनमुळे बनावट तक्रारींची नोंद घेणे शक्य आहे. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की भविष्यातील संदर्भाकरिता प्रगत ब्लॅक बॉक्स सारखी प्रणाली येण~या प्रत्येक कॉल, रेस्पॉन्स, ऍक्शन व क्षणांचे रेकॉर्डिंग करत असते. अमेरिकेतील ९११ या यंत्रणेपेक्षा “डायल २६११” अधिक सरस आहे कारण ही यंत्रणा बहुभाषिक असून इंटरनेट, व्हिओआयपी किंवा फ़ोनद्वारे येणारे फ़ेक कॉल्स यांची त्वरित दखल घेणे हे या यंत्रणेला शक्य आहे जेथे ९११ साठी ही बाब आजही डोकेदुखी आहे. भारत हा बहुभाषिक देश असल्यामुळे ही परियोजना बहुभाषिक सोयीयुक्त आहे. भाषेचा अडसर विसरुन, आपण आपल्या भाषेत संवाद साधू शकता यामुळे डायल २६११ केवळ हेल्प लाईन न राहाता लाईफ़ लाईन ठरणार आहे. महत्वाचे म्हणजे भारतात आपल्याला ढीगभर हेल्पलाईन नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. दुर्घटना, परिस्थिति, स्थळ आणि परिसर कोणताही असो २६११ ला कळवा, तातडीने तुम्ही आहात त्या ठिकाणी संकटानुसार पोलीस, अग्निशामन, वैद्यकिय मदत तसेच एनएसजी सारख्या सेवा आपल्या मदतीला धावतील. आत्महत्या करण्यापुर्वी २६११ला केलेला एक कॉल देखील आपल्याला नवजीवन ठरु शकेल. “अतिथी देवो भव:”, विदेशी पर्यटकांना तर “डायल २६११” एक विश्वासू सोबती ठरुन भारताच्या पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे. मुंबईवर झालेल्या दशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येकाच्या मनावर कोरला गेला आहे, आता हाच क्रमांक देशाच्या सुरक्षिततेसह बाल, महिला, वरिष्ठ नागरीक, प्रवासी, देशी विदेशी पर्यटक, विद्यार्थी, नोकरदार व व्यावसायिक यांच्यासाठी सुरक्षा कवच ठरणार आहे. भविष्यात जगात फ़क्त एकच नंबर… २६११, भारत सोडल्यास जवळपास प्रत्येक देशाला स्वत:ची नॅशनल ईमर्जन्सी टेलीफ़ोन यंत्रणा असली तरी डायल २६११ ही यंत्रणा जागतिक विस्तारक्षम आहे. त्यामुळे आपण पृथ्वीवरील कोणत्याही देशातील कोणत्याही स्थानावरुन २६११ वर संपर्क साधल्यास तेथील लगतची बचाव यंत्रणा आपल्या पर्यंत पोहचवता येणे शक्य होणार आहे.

“डायल २६११” यंत्रणा उभारण्या संबंधी बोर्डे यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तांत्रिक तसेच घटनात्मक अहवाल सादर केला असून संबंधित आधिकारी यांच्या बरोबर बैठका आणि चर्चा देखील झाल्या आहेत. “डायल २६११” हे कोणते प्रॉडक्ट, प्रॉजेक्ट वा बिझनेस डील नसून भारतात देशाच्या सुरक्षा व संरक्षणाच्या दृष्टीने “डायल २६११” कार्यान्वित झाल्यास ही माझी शहीदांना आणि वेळ प्रसंगी मदत न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागलेल्या आत्म्यांना योग्य श्रद्धांजली असेल.

— दिनकर बोर्डे,
शास्त्रज्ञ – टेलीकॉम्युनिकेशन ईंजिनिअर,
माजी तंत्रज्ञान सल्लागार – भारत सरकार,
मोबाईल : ०९४२२०५५१६०.
फ़्लॅट- ए१, स्वामी समर्थ हौ.सो, सर्वे नं. २२/१५, पवार हॉस्पिटल रोड, बालाजी नगर, पुणे – ४११ ०४३. मोबाईल: ०९४२२०५५१६०.

ईमेल: dinkarborde@gmail.com

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..