गर्भिणी अवस्थेमधे स्त्रीला स्वत: बरोबर आपल्या बाळाचेही पोषण करावयाचे असते. मातेने घेतलेल्या आहारापासून बाळाचे पोषण होते. गर्भ हा पूर्णत: मातेवरच अवलंबून असतो. त्यामुळे मातेचा आहार सकस, पूर्ण उष्मांक असलेला असणे आवश्यक आहे. सामान्य स्त्री पेक्षा गर्भिणी स्त्रीला आधिक उष्मांकाची गरज असते.
‘गर्भिणी स्त्री आहार घटक तालिका’
अ.क्र. आहार घटक सामान्य स्त्री गर्भिणी स्त्री स्तनपानकरणारी स्त्री
१] उष्मांकाची २२०० २५०० २५००
२] प्रोटीन ५० मी.ग्रॅम ६० ग्रॅम ७० ग्रॅम
३] कॅल्शियम ५०० मी.ग्रॅम १००० मी.ग्रॅम १५०० मी.ग्रॅम
४] लोह १८ मी.ग्रॅम ४० मी.ग्रॅम ३० मी.ग्रॅम
५] जीवनसत्व –अ ५००० I U ६००० I U ८००० I U
६] जीवनसत्व –ड ४०० I U ४०० I U ४०० I U
७] थायमीन १.१ मी.ग्रॅम १.५ मी.ग्रॅम
८] निकोटिनिक अॅसिड१४ मी.ग्रॅम १५ मी.ग्रॅम
९] अस्कोर्बीक अॅसिड ४५ मी.ग्रॅम ६० मी.ग्रॅम
१०] जीवनसत्व ब१२ २ ug. २ ug.
११] फोलिक अॅसिड ०.५ ग्रॅम १ ग्रॅम
प्रथम त्रैमासात गरोदर स्त्रीला वरील दर्शविलेल्या तक्त्याप्रमाणे फोलिक अॅसीड, प्रोटीन, थायमीन, इ अत्यंत आवश्यकता असते. हे आहारघटक मिळाल्यास योनिगत रक्तस्त्राव, गर्भपात होऊ शकतो किंवा गर्भधारणा पुढे चालू राहिल्यास बाळ वजनाने कमी जन्मास येते. काही वेळा तर अकाली प्रसव सुद्धा होतो. वरिल तक्त्यात दर्शविलेली जीवनसत्वे आहारात न मिळाल्यास गर्भिणी पांडू त्याच बरोबर गर्भिणी विषाक्तता (Toxiimia of pregnancy) होऊ शकते. तसेच प्रसवामधे रक्तस्त्राव अपरा गर्भाशयास चिकटून राहणे. प्रसवास प्राकृत वेळेपेक्षा विलंब होणे या व इतर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. म्हणून आहारामध्ये गरोदर स्त्रियांनी खालील पदार्थ, हिरव्या पालेभाज्या व फळांचा समावेश करावा. खालील तक्त्यावरून हे सहज लक्षात येईल.
अ.क्र | जीवनसत्व | प्राप्तीस्थान |
१ | जीवनसत्व-अ | कोबी,गाजर,लाल-पिवळीफळे,दुध,पनीर,लोणी, सर्व हिरव्या पालेभाज्या |
२ | जीवनसत्व-ब | अंडी, मासे, कडधान्ये, गव्हाचाकोंडा, गव्हांकुर, दुध,हिरव्या पालेभाज्या |
३ | जीवनसत्व-क | सर्व आंबट-गोड फळे, टोमॅटो, कलिंगड, पेरू, कोबी, अननस, बटाटे, हिरव्या पालेभाज्या |
४ | जीवनसत्व-ड | दुध, अंडी, मासे, याशिवाय, सूर्यप्रकाश |
५ | जीवनसत्व-इ | सुकामेवा, अंडी, दुध, वनस्पतीतेल, इ. |
६ | जीवनसत्व-के | गव्हाचा कोंडा, हिरव्यापालेभाज्या, टोमॅटो, फ्लावर, सोयाबीन, वनस्पतीतेल, प्राण्यांचे लिव्हर |
७ | कॅल्शियम | दुध, दुधापासून बनवलेले पदार्थ, मेथी, शेवग्याच्या शेंगा, बीट, अंजीर, द्राक्ष, बाजरी, तीळ, उडीद, शिंपल्यातील किडे |
८ | लोह | मेथी, हिरव्यापालेभाज्या, चणे, मुग, उडीद, सोयाबीन, खजूर, तीळ, बाजरी, अंडी, मांस, प्राण्यांचे यकृत |
जीवनसत्व ब हा एक जीवनसत्वाचा समूह आहे. यामधे ८ जीवनसत्वाचा समावेश असतो. ब -१ ,ब -२ ,ब -६ ,ब -१२, पेन्टॉथीनिक, अॅसिड, बायोटीन निएसीन इ.
वरिल तक्त्यावरून गर्भिणीस लागणाऱ्या आहार घटकाची कल्पना तुम्हाला आलेली आहेच. त्यामुळे त्याचा अभावी होणारे परिणाम पुढे वर्णन करित आहे.
जीवनसत्व अ – याच्या अभावी प्रथम त्रेमासात मळमळ व उलट्या होऊ शकतात. गर्भिणीच्या पायामध्ये गोळे येतात.
जीवनसत्व क – लोहाच्या शोषणासाठी याची आवशता आवश्यकता असते. याच्या आभावाने गर्भिणीच्या हिरड्यांना सुज येऊन ते स्पंजाप्रमाणे पोकळ होतात व रक्तस्त्राव होतो. “स्कर्वी” नावाचा रोग यामुळे होतो. याच्या अभावामुळे गर्भिणीला
रक्तक्षय होण्याची शक्यता असते.
जीवनसत्व ड – सकाळच्या कोवळ्या उन्हातून ते मिळते . गर्भिणीच्या चयापचया मध्ये या जीवनसत्वाचा महत्वाचा वाटा आहे.
जीवनसत्व के – याच्या अभावामुळे गर्भस्त्राव, गर्भपात, योनिगत रक्तस्त्राव होऊ शकतो.
जीवनसत्व इ – रक्तातील लाल कण या जीवनसत्वामुळे सुधृड बनतात. प्रजोत्पादनामधे या जीवनसत्वाचा महत्वाचा वाटा आहे. याच्या आभावाने काही स्त्रियांना वंध्यत्व येते.
लोह – लोहाच्या आभावाने गर्भिणीला पाण्डू होतो त्याचबरोबर प्रसवोत्तर रक्तस्त्रावाची शक्यता असते.
गर्भिणी अवस्थेत दुध, तूप, तांदूळ यांसारखे शुभ्र सात्विक पदार्थ स्त्रीने सेवन केल्यास होणारे बालक सुदृढ, गौरवर्णीय व कांतिमान होते. त्यामुळे आय्र्वेडत दुध, तूप, मध, लोणी, तूपभात इ. पदार्थांचे सेवन करण्यास सांगितले आहे.
या प्रमाणे आहारयोजना असल्यास पूर्णमास व प्राकृत प्रसव होते. प्रसवानंतर रक्तस्त्राव, राक्ताल्पता यांसारख्या गुंतागुंती निर्माण होत नाहीत. म्हणून गर्भिणी मातेने कुठल्याही परिस्थितीत परिपूर्ण आहार घेणे आवश्यक आहे.
Leave a Reply