डिझेलचे तांत्रिक नाव ‘हाय स्पीड डिझेल’ (एच.एस.डी.) असे आहे व ते रुडॉल्फ डिझेल या जर्मन संशोधकाच्या नावावरून आले आहे. वेगवान वाहनासाठी वापरले जात असल्यामुळे ‘हाय स्पीड’ हे नाव पडले. त्यामुळेच मोटार पंपासारख्या शेतकी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाच्या तुलनात्मक कमी गतीच्या इंजिनात वेगळ्या डिझेल तेलाचा वापर होतो व त्याला लाइट डिझेल ऑइल (एल.डी.ऑ.) असे संबोधतात.
डिझेल हे इंधन रंगहीन असू पण शकते, साधारणपणे हे इंधन पिवळ्या ते खाकी असते. रंगाचे वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी मिळणाऱ्या खनिज तेलाचे स्वरूप बदलते. उदा. रशियातून मिळणाऱ्या खनिज तेलापासून मिळणारे डिझेल पाण्यासारखे असते. गल्फच्या आखातात मिळणाऱ्या काळ्या तेलातून खाकी रंगाचे डिझेल अवतरते. आपल्याकडे ओ.एन. जी. सी. ही उत्खनन कंपनी जे खनिज तेल उपसते त्यापासून पिवळसर रंगाचे मिळते. त्यातच अलीकडे हवेचे प्रदूषण टळावे म्हणून डिझेल तेलातून सल्फर या मूलद्रव्याचा अंश निपटून काढला जातो व त्यामुळे डिझेल रंगहीन दिसते. रंग ही काही डिझेलची गुणवत्ता ठरविणारी कसोटी नव्हे.
डिझेल हे इंधन काहीसे जाडसर असते. पेट्रोलचे इंधन ‘स्पार्क इग्निशन’ पद्धतीने म्हणजे ठिणगी टाकून पेटविले जाते, मात्र डिझेल इंजिन हे ‘कम्प्रेशन इग्निशन’ पद्धतीने कार्य करते. याचा अर्थ, डिझेल हे इंधन इंजिनाच्या नळकांड्यातून अतिदाबाखाली पेट घेते. तिथे ठिणगी पाडणाऱ्या प्लगची गरज नसते. डिझेलमधील सल्फरचा अंश काढण्यासाठी डिहायड्रो डीसल्फरायझेशन ही खर्चीक यंत्रणा वापरतात. वास्तविक, गंधक हे मूलद्रव्य इंजिनातील दाब शोषणारे पूरक रसायन (एडिटिव्ह) असते. ते कमी केल्याने इंधनाची वंगणीयता कमी होते, ती भरून काढण्यासाठी डिझेल तेलात फॅटी अॅसिड इथर मिथाइल (एफ.ए.एम.इ.) हे जैविक तेल १०% पर्यंत मिसळावे लागते.
डिझेल तेलात असलेली हायड्रोकार्बन रसायने १३०० सें. ते ३६०० सें.पर्यंत उकळतात व त्या कसोटीचा इंजिनाच्या कार्याशी संबंध असतो. डिझेलमध्ये मेणाचा अंश असतो व त्यामुळे त्याचा ओतनबिंदू मर्यादित राखावा लागतो. या इंधनाचा जाडसरपणा त्याची वाहकता मोजून ठरविला जातो.
जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply