नवीन लेखन...

दिगंबर

(दिगंबर म्हणजे दिग्+अंबर. आकाश हेच ज्याचे वस्त्र तो भगवान महावीर दिगंबर. ज्याला एका वस्त्राचाही मोहन नाही. त्याच्या नावाने  चाललेले श्रीमंती वैभवाचे प्रदर्शन,  ओंगळवाणे अभिरुचीहीन पाहून या महान अवताराच्या भक्तांची कीव येते, अशाच एका समारंभाचा मंडप पाहून-)

भलंमोठं नक्षीदार प्रवेशद्वार
आज वैभवशाली मंडप झोकदार
छताला लखलखीत झुंबरं दिमाखदार
बसायला गाद्या टेकायला लोड
त्यावर पांढऱ्या शुभ्र चादरी चमकदार
लाऊड स्पीकर चा आवाज दमदार
सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर
भजनांच्या ठेक्यांचा चाललाय कहर
संत महंतांची गर्दी व्यासपीठावर
गलेलठ्ठ भक्तांची गर्दी मंडपभर
खाण्या-पिण्याची चालली चंगळ फार
अलिशान गाड्यांचा ताफा तयार
लखलखत्या चांदीच्या रथात
महंत साधूंची निघाली वरात
गाजत वाजत गेली शहरात
मंडपात उरलाय एकांत निवांत
प्रवेशद्वारावर एकटाच धीरगंभीर
बसलाय महावीर भगवान दिगंबर

— विनायक अत्रे.

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..