नवीन लेखन...

प्रसिध्द अभिनेत्री दिप्ती नवल

दिप्ती नवल यांच्या वडिलांना न्यूयॉर्कमध्ये नोकरी मिळाल्यावर त्या आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेला गेल्या. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९५७ रोजी अमृतसर येथे झाला. न्यूयॉर्कच्या सिटी युनिव्हर्सिटीतून दिप्ती नवल यांनी शिक्षण घेतले. खरे तर अभिनेत्री होणे हे दीप्ति नवल यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दीप्ति यांनी आपल्या आई-वडिलांकडे ही इच्छा बोलून दाखवली. पण दीप्ति नवल यांच्या वडिलाची इच्छा तिने एक मोठी चित्रकार बनावी, अशी होती. वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी पेन्टिंग आणि अभिनय या दोन्ही कला जोपासण्याचा निर्णय घेतला. कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दीप्ति ने न्यूयॉर्कमध्येच एका रेडिओ स्टेशनवर काम सुरु केले. यावर हिंदी कार्यक्रमही यायचे. यानंतर तिने अॅडक्टिंग आणि फिल्ममेकिंगचा कोर्स केला. यापश्चात दीप्तिला भारतात येण्याची संधी मिळाली आणि याच काळात दीप्तिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले. श्याम बेनेगल यांच्या ‘जुनून’ या चित्रपटापासून दीप्ति नवल यांनी आपल्या करीयरची सुरवात केली. दीप्ति नवल ‘जुनून’मध्ये ती केवळ दोन तीन दृश्यांत दिसल्या. त्यामुळे त्याची फार दखल घेतली गेली नाही. पण १९७९ मध्ये ‘एक बार फिर’मधील दीप्ति नवल यांना या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. दीप्ति नवल यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास ६० चित्रपटांमध्ये अभिनय केला. ‘चश्मे बहादूर’,‘अनकही’,‘मैं जिंदा हू’,‘कमल’ असे तिचे चित्रपट प्रचंड गाजले. केवळ अभिनयच नाही तर लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन या क्षेत्रातही त्यांनी काम केले. ‘थोडा सा आसमान’ या टीव्ही मालिकेची पटकथा दीप्ति नवल यांची होती. शिवाय या मालिकेची दिग्दर्शकही त्यांनी केले होते.

चित्रकार या नात्याने अनेक मोठ्या चित्रप्रदर्शनात त्यांची पेन्टिंग झळकल्या. कवयित्री म्हणून १९८३ मध्ये त्यांचा ‘लम्हा लम्हा’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. २००४ मध्ये ‘ब्लॅक विंड अॅेण्ड अदर पोयम्स’ हा तिचा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला. याशिवाय २०११ मध्ये एक लघूकथा संग्रहही आला. त्यांच्या प्रकाशित पुस्तकां मध्ये ‘लम्हा-लम्हा’ हे पुस्तक प्रसिध्द आहे. १९८४ मध्ये प्रकाश झा यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. तेव्हा त्यांची भेट दीप्ति नवलशी झाली. यानंतर प्रकाश झा यांनी दीप्तिला घेऊन ‘दामुल’ हा चित्रपट बनवला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. येथून दोघांमध्ये प्रेम बहरले. यानंतर दीप्ति व प्रकाश झा विवाहबंधनात अडकले. हे लग्न १७ वर्षे चालले. या दोघांना दोन मुलेही आहेत. मुलगा प्रियरंजन झा आणि मुलगी दिशा झा. प्रकाश व दीप्ति यांनी २००२ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर दीप्ति प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचा मुलगा विनोद पंडित यांच्या जवळ आली. दोघांनी लग्नाचा निर्णयही घेतला होता. पण त्याचपूर्वी विनोद यांचे निधन झाले. सध्या दीप्ति नवल मानसिकदृष्ट्या दुर्बल लोकांच्या आजाराबद्दल जनजागृतीचे काम करतात. ‘जलियावाला बाग’ सिनेमामधून सुरू झालेल्या दीप्ती नवल यांच्या फिल्मी करिअरचा प्रवास आजही सुरू आहे. ‘यारियां’ सिनेमात दीप्ती यांनी अभिनय केला आहे. जानेवारी २०१४ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात दीप्ती यांनी गर्ल्स होस्टेलच्या वॉर्डनची भूमिका साकारली होती.या सिनेमापूर्वी त्या २०१३ मध्ये ‘बीए पास’आणि’औरंगजेब’सिनेमातसुध्दा दिसल्या होत्या. ‘महाभारत 3D’या अॅनिमेटेड सिनेमा मधील ‘कुंती ‘पात्राला त्यांचा आवाज देण्यात आला आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..