नवीन लेखन...

किचनची दिशा

पूर्वी स्वयंपाकघर केवळ जेवण बनविण्यासाठी वापरलं जाई. धुणी-भांडी, धान्य साठवण, पाण्याची भांडी या सर्वासाठी स्वतंत्र जागा असे. त्यामुळे आग्रेयला अग्नी अर्थात स्वयंपाकस्थान असावं, त्यातूनच आग्नेय दिशेला किचन असावं, असा समज दृढ झाला. मात्र अनेक वापरांसाठी असलेलं आजचं आग्नेय दिशेचं किचन हे योग्य आहे का?

वास्तुशास्त्राच्या समजुतीनुसार घराचं स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेला असावं. पूर्वीच्या काळी ही संकल्पना मांडली गेली तेव्हा स्वयंपाकघरांमध्ये अग्नी प्रज्वलित होत असे: आजच्यासारखा पाण्याचा फारसा वापर होत नसे. वर्षभर लागणारी धान्यं, मसाले, तेल-तूप इत्यादी पदार्थ हे या किचनमध्ये न ठेवता वायव्य दिशेला असलेल्या साठवणीच्या जागेमध्ये ठेवले जायचे. पिण्याच्या पाण्याची भांडी आणि भांडी घासण्याची जागा ही घरासमोरील अंगणात ठेवली जायची.

प्राचीन संकल्पनांनुसार वास्तुनिर्मिती

सध्याच्या काळात जी घरं किंवा फ्लॅट बनवले जात आहेत त्यामध्ये स्वयंपाकघरामध्येच साठवणीची जागा असते. पाण्याची भांडीही किचनच्या कट्टय़ावर ठेवली जातात. खरकटी भांडी घासण्यासाठीही सिंकचा वापर केला जातो. अनेक घरांमध्ये भांडी धुण्यासाठी किचनच्या छतावर एक छोटी सिंटेक्सची टाकीही बसवली जाते. किचनमधून बाहेर पडणा-या सांडपाण्याचा निचरा व्हावा म्हणून जमिनीमध्ये त्याचा चेंबर बनवला जातो. अशा प्रकारे आज किचनमध्ये अग्नीबरोबरच पाण्याचाही भरपूर वापर केला जातो. त्याचबरोबर पाण्याचा निचरा होण्यासाठी आग्नेय दिशेला चेंबरस्वरूपात खड्डाही खणला जातो. अशा स्थितीमध्ये किचन आग्नेय दिशेला असणं योग्य आहे का?

जेव्हा आग्रेय दिशेला पाण्याची खूप साठवण केली जाते तेव्हा तिथे राहणा-या व्यक्‍तीच्या आर्थिक विकासाला बाधा पोहोचू शकते असं मानलं जातं.

जर किचनला लागूनच स्टोअररूम असेल तर्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या करिअर किंवा व्यवसायात अडथळे येऊ शकतात. भविष्यासाठी हाती पैसा उरत नाही असं वास्तुसंकल्पनांप्रमाणे मानलं जातं.

पूर्व आग्रेय दिशेला कोणत्याही प्रकारचा खडा हा भांडण, विवाद, कलह यांसाठी कारण बनू शकतो.

स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेलाच असले पाहिजे ही समजूत अनेक वास्तुशास्त्रतज्जञ ब-याच काळापासून लोकांच्या मनात ठसवत आले आहेत. परंतु असं काही नाही.

बदलत्या काळानुसार, गरजेनुसार किचन वेगवेगळ्या दिशांना बनवलं तर त्याचा प्रभाव कसा पडतो ते पाहू..

ईशान्य दिशा –
ईशान्य दिशेला जर किचन असेल तर वास्तुसंकल्पनांनुसार कुटुंबातील सदस्यांना यश मिळतं.

पूर्व दिशा –
ज्या घराचं किचन पूर्व दिशेकडे असतं त्या घरात पैशाची आवक चांगली राहते, परंतु घरातील सगळी जबाबदारी पत्नी सांभाळत असूनही तिच्या आनंदी वृत्तीत किंचित विघ्र येऊ शकतात, असं मानलं जातं.

आग्नेय दिशा-
आग्रेय दिशेतील किचन हे सगळ्यांत शुभ मानलं जातं. या दिशेतील किचनमुळे घरातील स्त्रिया या खूप आनंदी राहतात. सगळ्या प्रकारची सुखं मिळतात. आणि किचनमध्ये घराच्या मालकिणीची सत्ता चालते.

दक्षिण दिशा –
दक्षिण दिशेला किचन असेल तर घरात मानसिक अस्वस्थता सतत जाणवत राहते. त्याचबरोबर घराच्या मालकाला सतत राग अनावर होतो आणि त्यामुळे त्याचं स्वास्थ्य सतत बिघडत राहतं.

नैॠत्य दिशा –
ज्या घरात किचन नैक्रत्य दिशेला असतं त्या घराची मालकीण ही अतिशय उत्साही आणि रोमॅण्टिक असते, परंतु मालक मात्र तिला वेळ देऊ शकत नाही त्यामुळे दोघांमध्ये थोडया कुरबुरी होऊ शकतात.

पश्चिम दिशा –
पश्चिम दिशेला जर किचन असेल तर त्या घरातील सगळे व्यवहार घराची मालकीण पाहते. तिला आपल्या लेकीसुनांचं चांगलं सुख मिळतं. कुटुंबातील सगळ्या महिलांमध्ये चांगले संबंध असतात. परंतु या किचनमध्ये नेहमीच जरुरीपेक्षा जास्त खाद्यपदार्थ बनवले जातात आणि त्यामुळे अन्न वाया जातं किंवा ते वाटावं लागतं.

वायव्य दिशा-
ज्या घरातील किचन हे वायव्य दिशेला असतं त्या घराचा कर्ता पुरुष हा अतिशय रोमॅण्टिक असतो आणि त्याला भरपूर मैत्रिणी असतात. परंतु घरातील मुलीला बदनामीच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं.

उत्तर दिशा-
उत्तर दिशेला किचन असणा-या घरातील स्तिया या बुद्धिमान आणि प्रेमळ असतात. या घरातील पुरुषही प्रामाणिकपणे आणि सचोटीने नोकरी-व्यवसाय करून चांगला पैसा कमावतात.

थोडक्यात पश्चिम आणि उत्तर दिशेला असणा-या किचनचे परिणाम खूप चांगले पाहायला मिळतात. त्यामुळे किचन बनवताना मध्य पश्चिम किंवा मध्य-उत्तर दिशेला बनवलं तर येथे पाणीही भरपूर प्रमाणात साठवता येतं. तसंच पश्चिम दिशेचा सांडपाण्याचा पाइप हा सहजपणे उत्तर दिशेला वळवता येऊ शकतो, जेथे चेंबर बनवला जाऊ शकतो. आणि उत्तर दिशेतील चेंबर हा वास्तूसाठी अनुकूल असतो. त्यामुळे आजच्या काळात किचन हे आग्नेय दिशेलाच असलं पाहिजे हा अट्टहास आता कमी केला पाहिजे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..