दिग्दर्शिका अभिनेत्री समृद्धी पोरे यांचा जन्म ७ एप्रिलला झाला.
समृद्धी पोरे यांचे शिक्षण झाल्यावर लगेचच लग्न झाले. त्यांचे वडील सरकारी मोठ्या पोस्टवर होते. लग्नानंतर त्यांनी पहिल्यांदा मुंबई बघितली होती. मुंबईत येऊन रुईया कॉलेजला दाखला घेऊन पुढचे शिक्षण पूर्ण केले. त्या डीएमएलटी एलएलबी झाल्या व सरळ हायकोर्टात प्रॅक्टि.स करू लागल्या. सोबत घर संसार सुरू होताच. या १५-१६ वर्षांच्या वकिली प्रॅक्टीसमध्ये त्यांनी खूप खटले चालवले. प्रत्येक खटला एक सिनेमाची गोष्ट होऊ शकेल. त्या गोष्टी लिहीत गेले. त्यानंतर त्यांनी चित्रपट निर्मितीचे क्षेत्र निवडले त्या साठी त्यांनी मुंबई विद्यापीठातून फिल्म मेकिंगचा डिप्लोमा पूर्ण केला आहे.
हायकोर्टात प्रॅक्टीस करत असताना त्यांच्याकडे एक केस आली. प्रचंड भावनिक गुंतागुंत असलेल्या या केसचा विषय खूप महत्त्वाचा असून त्यावर चित्रपट होऊ शकतो हे समृद्धी पोरे यांनी जाणलं. त्यानंतर त्यांनी मोठ्या धाडसाने वकीली करत असतानाच ‘मला आई व्हायचंय’ या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन निर्मिती ही केली. समीक्षकांसह प्रेक्षकांनी गौरविलेल्या या चित्रपटाने अनेकांना भुरळ घातली. या चित्रपटाचा विषय होता ‘सरोगेशन’ म्हणजेच गर्भ भाड्याने देणे /घेणे. ज्यावेळी या विषयावर जास्त बोललंही जात नव्हतं तेव्हा या विषयावर त्यांनी ह्या चित्रपटाची कहाणी लिहिली, दिग्दर्शक म्हणून काम पाहिले व अशा विषयावर कुणीच निर्माता मिळत नाही बघून स्वत:च निर्मिती क्षेत्रातही पहिले पाऊल टाकले, आणि पदार्पणातच ‘मला आई व्हायचंय’ या त्यांच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, राज्य पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुध्दा मिळाले. ‘मला आई व्हायचंय’ या चित्रपटाचा हिंदीत रिमेक पण आला आहे. त्यानतरचा ‘डॉ प्रकाश बाबा आमटे’ या सामाजिक चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी व पुरस्कार मिळवून दिलेत. आणि हिंदीमध्ये ‘हेमलकसा’ असे संवेदनशील चित्रपट मोठ्या पडद्यावर आणले आहेत.
समृद्धी पोरे यांनी २०११ मधे आपला पहिला चित्रपट बनवला ‘मला आई व्हायचंय’. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे काम समृद्धी पोरे सांभाळत आहेत. अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे चित्रित होणारा मराठीतला हा पहिला हॉलीवूड चित्रपट ठरणार आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply